हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या भवितव्यासाठी आज राज्यातील ५५ लाख मतदार आपला हक्क बजावतील. या निवडणुकीत मुख्यमंत्री जयराम ठाकुर, माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंहांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिमाचल प्रदेश : निवडणूक जिंकण्यासाठी आश्वासनांचा पाऊस; काँग्रेस, भाजपाच्या जाहीरनाम्यांत नेमकं काय?

हिमाचल प्रदेशातील नागरिक भाजपाला पुन्हा संधी देतील, की विरोधी पक्ष काँग्रेससाठी सत्तेचा मार्ग मोकळा करतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झंझावाती प्रचार केला होता. “उमेदवार बघू नका, कमळाला मत म्हणजेच मला मत”, असं म्हणत भाजपाला मतदान करण्याचं आवाहन मोदींनी नागरिकांना केलं होतं.

हिमाचल प्रदेशातील निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पराभव यावेळी विजयात बदलण्याचं आव्हान काँग्रेसपुढे आहे. या निवडणुकीसाठी राज्यभरात सात हजार ८०० मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.

विश्लेषण : जुनी निवृत्तिवेतन योजना काय आहे आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीत हा ज्वलंत मुद्दा का ठरतोय?

“आम्हाला आशा आहे की लोक आणखी एक संधी देतील. सत्ताधारी सरकारला पुन्हा निवडून न देण्याची परंपरा मोडीत काढा, असे आवाहन आम्ही नागरिकांना केले आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी ‘एनडीटीव्ही’ या वाहिनीशी बोलताना दिली. या निवडणुकीत जवळपास १ लाख २१ हजारांवर मतदार ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. या निवडणुकीत २४ महिला उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Himachal pradesh election voting started today cm jayaram thakur hoping to get one more chance to bjp rvs
First published on: 12-11-2022 at 08:51 IST