केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यूपीए सरकारच्या काळात तपास यंत्रणांकडून खूप त्रास दिला गेला, असे वक्तव्य केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात केले आहे. या अग्नीपरीक्षेला शाहांनी अत्यंत शांतपणाने कुठलाही आरडाओरडा न करता तोंड दिले, असे सांगताना सिंह यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या चौकशीविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांवर अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

“मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल”, पंकजा मुंडेंची मंत्रीपद न मिळण्यावर सूचक प्रतिक्रिया!

“तपास यंत्रणांनी अमित शाहांना खूप त्रास दिला. या प्रकरणात शाहांना अनेकदा समन्स बजावण्यात आले. याविरोधात कुठलेही आंदोलन न करता ते या कठीण प्रसंगाला धीराने सामोरे गेले”, असे सिंह यावेळी म्हणाले. सोहराबुद्दीन शेख फेक एनकाऊंटर प्रकरणात अमित शाहांना अनेक महिने तुरुंगवास भोगावा लागला, अनेक कटू प्रसंगांचा सामना करावा लागला, अशी आठवणही सिंह यांनी करुन दिली. सोहराबुद्दीन शेख फेक एनकाऊंटर प्रकरणात अमित शाहांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

Black Magic Comment: असलं काही बोलून पंतप्रधानपदाची पातळी घसरवू नका, राहुल गांधींचा मोदींवर हल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००२ साली झालेल्या गुजरात दंगलींवेळी मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणांवर आधारीत ‘शब्दांश’ या पुस्तकाचे प्रकाशन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. शाह यांना ‘नेपथ्य के नायक’ म्हणत त्यांनी सक्षमपणे कर्तव्य पार पाडताना कधीही श्रेयवादासाठी चढाओढ केली नाही, असे सिंह यावेळी म्हणाले. पडद्याच्या मागे राहून शाह कुठल्याही लालसेशिवाय सरकार आणि पक्षासाठी काम करत असतात, अशी प्रशंसा करताना राजनाथ सिंह यांनी अमित शाहांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू उलगडून सांगितले.