Uttarkashi Tunnel Rescue Operation Update : उत्तराखंडमध्ये चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या पाच किलोमीटरच्या बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग १२ नोव्हेंबरला कोसळला. बोगद्याच्या सिलक्यारा दिशेकडील सुमारे ६० मीटरचा भाग खचल्याने ४१ कामगार अडकले होते. बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या दोन किलोमीटर भागात हे कामगार अडकले होते. या ४१ कामगारांना तब्बल १७ दिवसांनी बाहेर काढण्यात बचावपथकांना यश आलं आहे. इतर कामगारांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग आणि केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्हि. के. सिंह यांनी सुटलेल्या कामगारांची भेट घेतली. बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यासाठी बोगद्याबाहेरच जवळपास ४० रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. सर्व कामागारंची प्रकृती उत्तम असल्याचीही माहिती देण्यात येत आहे.

Pune, Father, murder son, pune latest news,
पुणे : वडिलांनी दिली मुलाला मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी
Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

कामगार बोगद्यात अडकल्यापासून सातत्याने त्यांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू होते. बोगद्यातील ढिगाऱ्यात खोदकाम करण्यासाठी ऑगर मशीन मागवण्यात आले होते. परंतु, हे मशिन सातत्याने नादुरुस्त ठरत होते. अखेर हे मशीन निकामी झाले. त्यामुळे, यंत्राची मदत न घेता कामगारांमार्फत खोदकाम करण्याबरोबरच अन्य पर्यायांचा विचार सुरू असल्याचे आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी शनिवारी सांगितले होते.

कामगार बाहेर येताच स्थानिकांनी मिठाईचे वाटप केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सिल्कियारा बोगद्यातील दुर्घटनेत अडकलेल्या ४१ मजुरांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आल्याने मी आनंदी आहे. अनेक यंत्रणांनी केलेले हे संघटित प्रयत्न आहेत. गेल्या काही वर्षांतील महत्त्वाच्या बचावकार्यापैकी हे बचावकार्य महत्त्वाचे ठरले. विविध विभाग आणि प्रत्येत यंत्रणांनी एकमेकांना पूरक सहकार्य केले. इतर अनेक आव्हानांना तोंड देत असतानाही सर्वांच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले.

असा पार पडला अंतिम टप्पा

सुटकेचा मार्ग तयार करण्यासाठी बोगद्याच्या वरील भागातून एकूण ८६ मीटपर्यंत खणावे लागले. बोगद्याच्या वरील भागातून १.२ मीटर व्यासाचे पाइप टाकण्यात आले. हे काम रविवारी सुरू झाले होते. सीमा रस्ते संघटनेचे प्रमुख राहिलेले सिंग हे बचाव मोहिमेत सहभागी झाले आहेत.

उत्तरकाशीत घडले काय घडले होते?

१२ नोव्हेंबर २०२३ ला पहाटे सिलक्यारा ते बारकोटदरम्यान निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्याने त्यात ४१ मजूर आत अडकले. बोगद्यात २६० ते २६५ मीटर आतमध्ये मातीच्या ढिगाऱ्यापलीकडे अडकलेल्या मजुरांना बाहेर काढणे उत्तराखंड सरकारसमोर एक आव्हान होते. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा मजुरांना बाहेर काढण्याच्या कामात गुंतल्या. पाईपच्या माध्यमातून त्यांना प्राणवायू आणि खाद्यपदार्थ पाठवणे सुरू केले. वॉकी-टॉकीच्या माध्यमातून मजुरांशी संपर्कही साधण्यात आला होता. बोगद्यात अडकलेले मजूर सिलक्याराच्या बाजूने आत गेले होते. ज्या बोगद्यात ते अडकले होते, त्यात हालचाल करण्यासाठी जवळपास दोन किलोमीटरचा भाग उपलब्ध होता. त्यामुळे मजुरांची घुसमट वगैरे झाली नाही. तसेच विजेचे दिवे असल्यामुळे वावरही सुलभ राहिला.

कोणत्या यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या?

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस, वेस्टर्न कोल फिल्ड लि.सह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी झाल्या होत्या.