काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवलं आहे. त्याप्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. अशात लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. या निर्णयानंतर राजकीय क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

त्यात राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यातील एक संवाद समोर आला आहे. संसदेच्या आवारात पायऱ्यांवरून उतरताना राहुल गांधींनी मल्लिकार्जुन खरगेंना मदत केली. तेव्हा राहुल गांधींनी माध्यमांना लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा : “राहुल गांधींचं निलंबन ही काँग्रेससाठी सुसंधी”, काय आहेत कारवाईमागचे अन्वयार्थ? जाणून घ्या गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

नक्की काय घडलं?

संसदेच्या आवारात पायऱ्यांवरून खाली उतरत असताना राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंना मदत करत होते. तेव्हा राहुल गांधी खरगेंना म्हणाले की, “मी तुम्हाला हात लावला, तर ते म्हणतील, मी नाक तुमच्या पाठीवर पुसत आहे. निव्वळ मुर्खपणा आहे. तुम्ही पाहिलं का ते? मी तुम्हाला मदत करतोय आणि ते म्हणत आहे, तुमच्या पाठीवर नाक हात पुसतोय.”

दरम्यान, राहुल गांधींवर लोकसभा सचिवालयाने केलेल्या कारवाईनंतर काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी म्हटलं की, “राहुल गांधी सत्य मांडत होते आणि मांडत राहणार. हे त्यांना पचत नाही. त्यामुळे राहुल गांधींवर समस्या संपतील असं त्यांना वाटत असेल. पण, त्यांच्या समस्या संपणार नाहीत. आम्ही जेपीसीची मागणी करत राहू. लढत राहू… लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जेलमध्ये जावे लागलं तरी तयार आहोत,” असा हल्लाबोल खरगेंनी भाजपावर केला आहे.

हेही वाचा : संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले, “मी… ”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार झालं आहे. आम्ही तुरूंगात जाण्यासाठी तयार आहोत. मात्र, अडाणी प्रकरणात जेपीसी चौकशीची मागणी करत राहणार,” असं काँग्रसेचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं.