मोदी एक विश्वासू व्यक्ती आहेत. परदेशातील काळा पैसा आणण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे पाकिस्तानचे माची क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इंसाफ या राजकीय पक्षाचे नेते इमरान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधील एखाद्या राजकीय व्यक्तीने भारतीय पंतप्रधानांचे कौतुक करणे ही गोष्ट फार दुर्मिळ आहे.
परदेशी बँकांतील काळा पैसा भारतात आणण्यासाठी नरेंद्र मोदी सध्या प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे इम्रान खान यांनी कौतुक केलं आहे. स्वत: इम्रान खानही पाकिस्तानातील विरोधी पक्षाचे एक नेता असल्याने काळा पैसा पाकिस्तानात परत आणण्याची मागणी ते करत आहेत. काश्मीर आणि सीमा वादावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा रद्द झाली होती. त्यानंतर पाकमधील नेत्यांकडून मोदींवर टीका करण्यात आली होती. आता इम्रान खान यांच्याकडून मोदींचे कौतुक करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2014 रोजी प्रकाशित
नरेंद्र मोदी विश्वासू व्यक्ती- इम्रान खान
पाकिस्तानमधील एखाद्या राजकीय व्यक्तीने भारतीय पंतप्रधानांचे कौतुक करणे ही गोष्ट फार दुर्मिळ आहे.
First published on: 08-11-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imran khan lauds modi for anti black money initiatives