पीटीआय, बेळगाव : कर्नाटक सरकारने चित्रपटगृहे, शाळा आणि महाविद्यालयांत मुखपट्टीचा वापर अनिवार्य केला आहे. जगभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे तसेच देशात ओमायक्रॉनचा उपप्रकार बीएफ.७ चा संसर्ग होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मद्यालयांमध्ये प्रवेश करण्यासाठी करोनाप्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या असणे आवश्यक आहे. हेच बंधन रेस्तराँ आणि पबमध्ये जाणाऱ्यांना असेल.

या सर्व ठिकाणी नववर्ष साजरे करताना तेथील आसन क्षमतेप्रमाणेच प्रवेश दिला जाईल. तसेच त्यासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर आणखी एक तास ( म्हणजे १ जानेवारीच्या पहाटे १ वाजेपर्यंतच) ही ठिकाणे सुरू ठेवता येतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे नववर्षांनिमित्त जेथे मोठय़ा प्रमाणावर गर्दी होईल, तेथे सर्वाना मुखपट्टी बंधनकारक असेल. अशा ठिकाणी लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जाऊ नये, अशी सूचना सरकारने केली आहे.  राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर आणि महसूल मंत्री तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रभारी आर. अशोक यांच्या उपस्थितीत झालेल्या तज्ज्ञांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

देशभरात आज रुग्णालयीन सराव

नवी दिल्ली : केंद्र सरकारने करोनाप्रतिबंधासाठी खबरदारीचा इशारा दिल्यानंतर रुग्णालयीन यंत्रण सज्ज ठेवण्यासाठी मंगळवारी देशात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत रुग्णालयीन उपचारांसाठी सराव कार्यक्रम राबविला जाणार आहे. येथील सफदरजंग रुग्णालयातील सरावाची पाहणी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया करणार आहेत. त्यांनी सोमवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तज्ज्ञांची बैठक घेतली.

ब्रिटनमध्ये नव्या वर्षांत करोना आकडेवारीची प्रसिद्धी बंद

लंडन : ब्रिटन नवीन वर्षांपासून करोना प्रादुर्भावासंदर्भातील नियमित प्रारूप आकडेवारी प्रकाशित करणे थांबवणार आहे. औषधे व प्रतिबंधक लसीकरणाद्वारे करोनाच्या विषाणू प्रतिबंधाच्या उपाययोजना करत करोनासह जगणे सुरू करण्याचा टप्पा देशाने गाठला आहे. त्यामुळे ही आकडेवारी प्रसिद्ध करणे इथून पुढे गरजेचे नसल्याचे ब्रिटनच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. हंगामी फ्ल्यूसारख्या  आजाराप्रमाणे करोना विषाणूवर उपाययोजना केल्या जातील.