Helpline For Indians In Iran: इराण-इस्रायल यांच्यात गेल्या पाच दिवसांपासून लष्करी संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर आक्रमक हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी नवी दिल्लीत २४x७ नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी एक आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे.

एक्सवरील एका पोस्टमध्ये, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, “इराण आणि इस्रायलमधील सध्याच्या घडामोडी लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्रालयात २४x७ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.”

नियंत्रण कक्षाचे संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहेत:

१८००११८७९७ (टोल फ्री)

+९१-११-२३०१२११३

+९१-११-२३०१४१०४

+९१-११-२३०१७९०५

+९१-९९६८२९१९८८ (व्हॉट्सअ‍ॅप)

situationroom@mea.gov.in

याशिवाय, इराणमधील तेहरान येथील भारतीय दूतावासाने २४/७ आपत्कालीन हेल्पलाइन सुरू केली आहे ज्याची संपर्क माहिती खालीलप्रमाणे आहे:

फक्त कॉलसाठी:

१. +९८ ९१२८१०९११५, +९८ ९१२८१०९१०९

व्हॉट्सअ‍ॅपसाठी:

२. +९८ ९०१०४४५५७, +९८ ९०१५९९३३२०, +९१ ८०८६८७१७०९.

३. ⁠बंदर अब्बास: +९८ ९१७७६९९०३६

४. ⁠जाहेदान: +९८ ९३९६३५६६४९

cons.tehran@mea.gov.in.

भारतीय विद्यार्थ्यांचे सुरक्षित स्थलांतर

तत्पूर्वी सोमवारी, परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “तेहरानमधील भारतीय दूतावास सुरक्षा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी मदत करत आहे. काही प्रकरणांमध्ये, विद्यार्थ्यांना इराणमधील सुरक्षित ठिकाणी दूतावासाच्या मदतीने स्थलांतरित केले जात आहे. इतर व्यवहार्य पर्यायांची देखील चाचपणी सुरू आहे.”

दोन्ही देश आक्रमक भूमिकेत

इस्रायल आणि इराण अशा दोन्ही बाजूंनी होत असलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये इराणमध्ये किमान २२४ लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात इराणचे काही उच्च लष्करी कमांडर, अणुशास्त्रज्ञ आणि नागरिकांचा समावेश आहे.

दुसरीकडे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या हद्दीत झालेल्या इराणी हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान २४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी तेहरानमधील अमेरिकन नागरिकांना तेथून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, इराण हे युद्ध जिंकणार नसून त्यांनी यासाठी चर्चा करावी, असेही ट्रम्प म्हणाले आहेत.

याचबरोबर जेरुसलेममधील अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे की, ते इस्रायल सोडत असलेल्या अमेरिकन लोकांना थेट मदत करण्याच्या स्थितीत नाहीत. सोमवारी बंद असलेला दूतावास मंगळवारीही बंद राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेरुसलेममधील अमेरिकन दूतावासाने पुढे म्हटले आहे की, सर्व अमेरिकन सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांच्या निवासस्थानाजवळ आणि सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये राहावे.