Narendra Modi : पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांची हत्या करण्यात आली. यामागे पाकिस्तानचा हात आहे हे लक्षात आल्यावर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला ठोस उत्तर दिलं. पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होईल की काय? अशी स्थिती होती. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केल्याचं म्हटलं होतं. त्याच दिवशी म्हणजेच ९ मे रोजी युद्धविरामही जाहीर करण्यात आला होता. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला होता. या चर्चेत त्यांनी भारताने मध्यस्थी स्वीकारली नव्हती आणि स्वीकारणार नाही हे स्पष्ट पणे सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना काय सांगितलं?
ऑपरेशन सिंदूरबाबत भारत-पाकिस्तान मध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या सगळ्या घटनाक्रमाबाबत मोदी आणि ट्रम्प यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या चर्चे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितलं की ऑपरेशन सिंदूर हे शस्त्रविरामापर्यंत गेलं पण त्यात अमेरिकेची मध्यस्थी नव्हती, यापुढेही नसेल. भारत आणि अमेरिका व्यापार विषयक संबंध किंवा अमेरिकेनो दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करणं याबाबत काहीही चर्चा झाली नव्हती. भारताने आधीही अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली नव्हती यापुढेही कधीच स्वीकारणार नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं.
परराष्ट्र सचिवांनी आणखी काय सांगितलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात विस्तृत चर्चा झाली. याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी माहिती दिली. यावेळी मिसरी असंही म्हणाले की जी ७ परिषदेत ट्रम्प आणि मोदी यांची भेट झाली नाही याचं दुसरं कुठलंही कारण नव्हतं. ट्रम्प यांना लवकर परतायचं होतं त्यामुळे ते निघून गेले आणि ही भेट होऊ शकली नाही. आता दोन्ही नेत्यांची फोनवरुन चर्चा झाली. दोघांमध्ये ३५ मिनिटं चर्चा झाली. या चर्चेत भारताने ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेची काही मध्यस्थी नव्हती असं स्पष्ट केलं.
आम्ही ९ मे रोजी जेडी व्हान्स यांच्याशी फोनवर काय चर्चा झाली?
ऑपरेशन सिंदूर राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला करारा जवाब दिला. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम मी घडवून आणला हे डोनाल्ड ट्रम्प यांनी आजवर वारंवार सांगितलं आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत परराष्ट्र सचिवांनी हेच सांगितलं की मोदी आणि ट्रम्प यांच्यात विस्तृत चर्चा झाली. तसंच शस्त्रविरामाचं श्रेय तुमचं नाही. एवढंच नाही तर आम्ही जेव्हा उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्याशी ९ मे रोजी चर्चा केली तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करु शकतो. त्यावेळी आम्ही व्हान्स यांनाही स्पष्ट सांगितलं होतं की पाकिस्तानने हल्ला केला तर आम्हीही त्यांना उत्तर देऊ. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं. सगळा घटनाक्रम मोदी यांनी ट्रम्पना सांगितलं. तसंच भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यदलात शस्त्रविरामाची चर्चा झाली कारण पाकिस्तान गुडघ्यांवर आला होता.