पीटीआय, वॉशिंग्टन, नवी दिल्ली
अमेरिकी मालावर प्रचंड आयातशुल्क लादणाऱ्या भारताने आपले कर मोठ्या प्रमाणात कमी करण्याचे मान्य केले आहे असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केला. त्यांच्या यासंबंधी वक्तव्यानंतर भारतामध्ये राजकीय वाद उद्भवला आहे.
ट्रम्प ओव्हल कार्यालयातून यासंबंधी बोलताना म्हणाले की, जगातील भारत आमच्याकडून प्रचंड शुल्क आकारतो. पण आता आम्ही त्यांचे धोरण उघड केल्यामुळे अखेरीस त्यांनी त्यांचे आयातशुल्क मोठ्या प्रमाणात कमी करण्याचे मान्य केले आहे. वाणिज्यमंत्री पीयूष गोयल व्यापारावर चर्चा करण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये असतानाच ट्रम्प यांनी याप्रकारे दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी दावा केल्याप्रमाणे सरकारने खरोखर आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे का असा प्रश्न काँग्रेस पक्षाने शनिवारी केंद्र सरकारला विचारला. या मुद्द्यावर संसदेला विश्वासात घेतले जावे असे आवाहन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले.
अमेरिकेच्या दबावासमोर झुकून आणि आयातशुल्क कमी करून मोदी सरकारने भारतीय शेतकरी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याोजकांचे हितसंबंध सोडून दिले आहेत का असा प्रश्न काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्स’वर पोस्ट लिहून विचारला.
भारत आमच्यावर प्रचंड आयातशुल्क लावतो. पण आता त्यांना अखेरीस हे लक्षात आले आहे की कोणीतरी त्यांचे धोरण उघड करत आहे. त्यामुळे त्यांनी आयातशुल्क भरपूर कमी करण्याचे मान्य केले आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका