scorecardresearch

Premium

चिंता वाढली! करोनाने पुन्हा डोकं वर काढलं, २४ तासांत आढळले १४८ नवे रुग्ण, ८०८ रुग्णांवर उपचार

चीनमध्ये न्यूमोनियाचा नवीन व्हेरिएंट आढळल्याने तिथला आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तिथल्या अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना हा न्यूमोनिया झाला असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

148 New COVID-19 Cases
देशातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून ८०८ करोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. (PC : AFP)

देशात पुन्हा एकदा करोनाचा विस्फोट झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अनेक महिन्यांनंतर देशात मोठ्या प्रमाणात करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १४८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून ८०८ करोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. याचाच अर्थ देशात सातत्याने करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. चीनमध्ये एका गूढ आजाराने तिथल्या आरोग्य विभागाची चिंता वाढवलेली असताना भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

चीनमध्ये न्यूमोनियाचा नवीन व्हेरिएंट आढळल्याने तिथला आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तिथल्या अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना हा न्यूमोनिया झाला असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. एका बाजूला चीनमधील वैज्ञानिक या नव्या न्यूमोनियावर संशोधन करत असताना भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भारताचं आरोग्य मंत्रालय सतर्क झालं आहे. सध्या तरी या गोष्टीची अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही, असं म्हटलं जात आहे. कारण भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेलं आहे. परंतु, लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

coaching classes latest news in marathi, coaching classes start up status marathi news, coaching classes ban marathi news
बंदी कसली… कोचिंग क्लासेसना ‘स्टार्टअप’ दर्जा द्या
Shiv Sena city chief Kalyan Mahesh Gaikwad marathi news, mahesh gaikwad is now out of danger marahi news
कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड अतिदक्षता विभागातून बाहेर, प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा डाॅक्टरांचा दावा
american attack
अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला; पत्नीचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र, विद्यार्थ्यांवर होणार्‍या हल्ल्याचे सत्र कधी थांबेल?
nagpur police salary delayed marathi news, nagpur salary of police department delayed marathi news
नागपूर : पगार रखडल्याने पोलीस कर्मचारी उसनवारीवर

हिवाळा सुरू झाल्यानंतर देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते. गेल्या तीन वर्षांमध्ये आरोग्य विभागाला असा अनुभव आला आहे. गेल्या वर्षीदेखील हिवाळा सुरू होताच अचानक करोनाबाधित रुग्ण आढळू लागले होते. पुन्हा एकदा डिसेंबर महिन्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाचं या वाढत्या आकडेवारीवर लक्ष आहे. तसेच कोणीही चिंता करू नये असं म्हटलं आहे.

हे ही वाचा >> …अन् केसीआर वॉकरच्या सहाय्याने चालू लागले, तेलंगणाच्या माजी मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया

चीनमधल्या गूढ आजाराचा भारतात प्रवेश?

चीनमधील एका गूढ विषाणूने तिथल्या आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहेत. दरम्यान, हा गूढ विषाणू भारतात सापडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. चीनमधील न्यूमोनिया विषाणूने भारतात प्रवेश केला असून सात भारतीयांना या आजाराची लागण झाल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंकेतस्थळांनी प्रसिद्ध केलं होतं. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात या गूढ आजाराने ग्रस्त रुग्ण उपचार घेत असल्याचा दावा वेगवेगळ्या वृत्तांमध्ये करण्यात आला होता. परंतु, हे वृत्त खोटं असल्याचं एम्स रुग्णालयाने म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India reports 148 new covid 19 cases in 24 hours asc

First published on: 09-12-2023 at 18:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×