पाकिस्तानने शनिवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, जम्मू काश्मीरच्या आर. एस पूरा आणि अरनिया भागात पाकिस्तानी लष्कराकडून बेछूट गोळीबार कऱण्यात आला . आज पहाटे केलेल्या जोरदार गोळीबारात सीमेवरील गावातील दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तर, पाच नागरिक जखमी असून, एक सीमा सुरक्षा दलाचा जवानही जखमी झाला आहे.
पहाटे १ वाजल्यापासून सुरु असलेल्या या गोळीबारात पाकिस्तानने सीमेवरील २२ चौक्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यात सीमावर्ती भागात राहणाऱ्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. मुहम्मद अक्रम आणि त्यांचा १३ वर्षीय मुलगा अस्लम या दोघांचा गोळीबारात मृत्यू झाला तर अक्रम यांची पत्नी व तीन मुले जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जम्मू वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या जोरदार गोळीबारामुळे सीमेवरील सुमारे दोन हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Aug 2014 रोजी प्रकाशित
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, २ ठार
पाकिस्तानने शनिवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, जम्मू काश्मीरच्या आर. एस पूरा आणि अरनिया भागात पाकिस्तानी लष्कराकडून बेछूट गोळीबार कऱण्यात आला .
First published on: 23-08-2014 at 09:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army uncover cross border tunnel pakistani rangers kill two civilians injure five