दिल्लीत जेएनयू युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे. अनेक क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीच्या विरोधात आपला आवाज उठवत आहेत. भारतीय संघाचा बॉक्सर विजेंदर सिंहनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करत विद्यार्थ्यांना आपला पाठींबा दर्शवला होता.

विजेंदरच्या या वक्तव्यावर एका नेटकऱ्याने, तू फक्त बॉक्सिंगकडे लक्ष दे. या फालतुच्या लफड्यांमध्ये कशाला अडकतोस, एक खेळाडू म्हणून तु आम्हाला आवडतोस अशी कमेंट केली.

विजेंदरनेही या नेटकऱ्याला आपल्या आक्रमक स्वभावाप्रमाणे, जाट हूँ अंधभक्त नही ! असं म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या परिसरात ५ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता निश्चित करण्याबाबत उपाय सुचवण्यासाठी विद्यापीठाने पाच सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे, असे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले. सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या काय, याचीही समिती चौकशी करणार आहे.