US Indian Origin Jailed : भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला अमेरिकेत २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमनदीप सिंग असं या व्यक्तीचं नाव आहे. अमनदीप सिंगने दारू पिऊन गाडी चालवल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. या प्रकरणी अमनदीप सिंगला न्यायालयाने २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अमनदीपवर दारूच्या नशेत ताशी १५० किलोमीटर वेगाने गाडी चालवल्याचा आरोप होता.

वृत्तानुसार, अमनदीप सिंगला लाँग आयलंडच्या मिनेओला येथे २५ वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी न्यायालयात त्याच्यावर संताप व्यक्त केला. यावेळी माझ्यावरील तुमचा राग समजण्यासारखा आणि पूर्णपणे योग्य आहे. ही सर्व माझी चूक होती, असं अमनदीप सिंगने न्यायालयात प्रतिक्रिया देताना सांगितलं. तसेच एखाद्याचे मूल गमावणं हे सर्वात मोठे दुःख आहे, असंही अमनदीप सिंगने यावेळी म्हटलं.

दरम्यान, शिक्षेची सुनावणी सुरु असताना पीडितांच्या समर्थकांची न्यायालयात मोठी गर्दी केली होती. ३६ वर्षीय अमनदीप सिंग एका बांधकाम कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता. तसेच आता पॅरोल घेतानाही किमान शिक्षा भोगावी लागेल असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यावेळी अमनदीप सिंगने न्यायालयात आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली. तसेच सगळी माझी चूक होती असंही मान्य केलं. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं घटना काय घडली होती?

भारतीय वंशाचे बांधकाम अधिकारी अमनदीप सिंग हे अमेरिकेत राहत होते. मात्र, अमनदीप सिंगने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. मे २०२३ मध्ये न्यूयॉर्कच्या लाँग आयलंडवर हा अपघात झाला होता. या अपघातात १४ वर्षांच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर न्यायालयाने अमनदीपला कठोर शिक्षा सुनावली आहे.