Defensive Asylum Applications USA: विदेशात जाऊन चांगले आयुष्य जगण्याची धडपड दाखविणारा डंकी नावाचा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. विदेशात नोकरी मिळवायची आणि तिथेच स्थायिक व्हायचे ही स्वप्ने अनेक भारतीय तरुण पाहत असतात. युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक स्थलांतरीत होत असतात. विशेषतः अमेरिकेत आसरा मागणाऱ्या भारतीय नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागच्या तीन वर्षांत अमेरिकेत आसरा मागणाऱ्यांच्या संख्येत ८५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने दिलेल्या माहितीनुसार २०२१ साली ४,३३० भारतीय नागरिकांनी आश्रय मागण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर २०२३ आर्थिक वर्षात ही संख्या वाढून तब्बल ४१,३३० लोकांनी अमेरिकेत आसरा मागितला आहे. भारतीय यंत्रणेने सांगितले की, यातली बहुसंख्य अर्जदार हे गुजरातमधील आहेत.

रक्षात्मक आश्रय मागणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या पाचव्या क्रमाकांवर आहे. ऑक्टोबर महिन्यात होमलँड सिक्युरिटी विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ४१,३३० अर्जदारांपैकी ५,३४० अर्ज पात्र ठरले होते.

हे वाचा >> फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं विधान; धर्माचा उल्लेख करत सरकारला सुनावलं…

तीन पटींनी अर्जदारांची संख्या वाढली

अमेरिकेच्या नागरिकता आणि इमिग्रेशन सर्विसेसला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये आसरा मागणारे ४,३३० अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये अफरमेटिव्ह अर्ज २०९० तर डिफेन्सिव अर्ज २,२४० होते. तर २०२२ मध्ये हा आकडा वाढला. यावर्षात एकूण १४,५७० अर्ज प्राप्त झाले.तर २०२३ मध्ये हा आकडा ८५५ टक्क्यांनी वाढून ४१,३३० वर पोहोचला.

हे ही वाचा >> हद्दच झाली! लग्नाच्या पत्रिकेवरही आता ‘बटोगे तो कटोगे’चा नारा; व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकेत मोदी-योगींचा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किती भारतीयांना आसरा मिळाला

अहवालानुसार २०२१ साली एकूण १,३३० भारतीयांना अमेरिकेत शरण मिळाली. तर २०२२ साली ही संख्या तीन पटींनी वाढून ४,३६० भारतीयांना अमेरिकेत आसरा मिळणार. तर तिसऱ्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये ५,३४० जणांचे अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.