पॉवरप्लेमध्ये संथ खेळी, गचाळ क्षेत्ररक्षण आणि फसलेली रणनिती यामुळे मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्जविरुद्ध ९ गड्यांनी मात खावी लागली. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२१चा १७वा सामना खेळवण्यात आला. यात नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या मुंबईने चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर २० षटकात ६ बाद १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबकडून केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी दमदार भागीदारी रचत १७.४ षटकातच विजय मिळवला.
पंजाबचा डाव
मुंबईच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. ५३ धावांची सलामी भागीदारी केल्यानंतर पंजाबला पहिला धक्का बसला. मंबईचा फिरकीपटू राहुल चहरने मयंकला (२५) धावांवर बाद केले. सूर्यकुमारने त्याचा झेल घेतला. त्यानंतर मैदानात आलेल्या ख्रिस गेलने राहुलसोबत १६व्या षटकात पंजाबचे शतक फलकावर लावले. राहुलने १७व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. १८व्या षटकात या दोघांनी पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ख्रिस गेल आणि केएल राहुल यांनी ७९ धावाची अभेद्द भागीदारी रचत हा विजय साकारला. राहुलने नाबाद ६० तर गेलने नाबाद ४३ धावांचे योगदान दिले.
मुंबईचा डाव
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात मुंबईचा सलामीवीर क्विंटन डि कॉकने दीपक हुडाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, मोझेस हेन्रिक्सने त्याचा झेल टिपला. कॉकला ३ धावा करता आल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला. पॉवरप्लेमध्ये मुंबईने १ बाद २१ धावा केल्या. डि कॉक बाद झाल्यानंतर रोहितला साथ देण्यासाठी ईशान किशन मैदानात आला. मात्र, मुंबईने पॉवरप्लेनंतर ईशान किशनला गमावले. आज संधी मिळालेल्या फिरकीपटू रवी बिश्नोईने किशनला यष्टीपाठी झेलबाद केले. किशनला १७ चेंडूत केवळ ६ धावा करता आल्या. त्यानंतर रोहित-सूर्यकुमार यांनी अर्धशतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सांभाळला. १४व्या षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले.
रवी बिश्नोईने पंजाबला १७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यश मिळवून दिले. मोठा फटका खेळण्याच्या नादात सूर्यकुमार यादव ख्रिस गेलकडे झेल देऊन बसला. सूर्यकुमारने ३ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. पुढच्याच षटकात मुंबईने रोहितला गमावले. त्याने ५ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. या दोघांनंतर मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पंजाबकडून मोहम्मद शमी आणि बिश्नोईने प्रत्येकी २ बळी घेतले.
दोन्ही संघांची प्लेईंग XI
मुंबई इंडियन्सः रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, क्विंटन डि कॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.
पंजाब किंग्जः केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हुडा, रवी बिश्नोई, मोझेस हेनरिक्स, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, शाहरुख खान, फॅबियन एलन.
पंजाबने १७.४ षटकात मुंबईचे आव्हान पूर्ण केले. ख्रिस गेल आणि केएल राहुल यांनी ७९ धावाची अभेद्द भागीदारी रचत हा विजय साकारला. राहुलने नाबाद ६० तर गेलने नाबाद ४३ धावांचे योगदान दिले.
पंजाबचा कर्णधार केएल राहुलने १७व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले.
गेल-राहुल जोडीने १६व्या षटकात पंजाबचे शतक फलकावर लावले. पंजाबला २४ चेंडूत २४ धावांची गरज आहे.
१३ षटकात पंजाबने १ बाद ८२ धावा केल्या आहेत. ख्रिस गेल आणि राहुल खेळत असून त्यांवा विजयासाठी ४२ चेंडूत ५० धावांची गरज आहे.
५३ धावांची सलामी भागीदारी केल्यानंतर पंजाबला पहिला धक्का बसला. मंबईचा फिरकीपटू राहुल चहरने मयंकला (२५) धावांवर बाद केले. सूर्यकुमारने त्याचा झेल घेतला.
पंजाबने पहिल्या पॉवरप्लेच्या ६ षटकात बिनबाद ४५ धावा फलकावर लावल्या.
मुंबईच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली आहे. ४ षटकात पंजाबने बिनबाद ३७ धावा केल्या.
केएल राहुल आणि मयंक अग्रवालने पंजाबच्या डावाची सुरुवात केली. ट्रेंट बोल्टने मुंबईसाठी टाकलेल्या पहिल्या षटकात पंजाबने बिनबाद १ धाव केली.
शेवटच्या षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर कृणाल पंड्या बाद झाला. त्याला 3 धावा करता आल्या. या षटकात अर्शदीपने 6 धावा केल्या. 20 षटकात मुंबईने 6 बाद 131 धावा केल्या.
मुंबईचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या सामन्यातही अपयशी ठरला. हार्दिकला केवळ 1 धाव करता आली. अर्शदीपने त्याला हुडाकरवी झेलबाद केले. 18.4 षटकात मुंबईने 5 बाद 123 धावा केल्या.
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर फटका खेळताना मुंबईचा कर्णधार १८व्या षटकात झेल बाद झाला. रोहितने ५ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या.
रवी बिश्नोईने पंजाबला १७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यश मिळवून दिले. मोठा फटका खेळण्याच्या नादात सूर्यकुमार यादव ख्रिस गेलकडे झेल देऊन बसला. सूर्यकुमारने ३चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या.
मुंबईने १६व्या षटकात शतक पूर्ण केले.
१४व्या षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहित-सूर्यकुमार यांनी अर्धशतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सांभाळला. १४ षटकात मुंबईने २ बाद ८८ धावा केल्या
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने फक्त २१ धावा केल्या.
संथ खेळणाऱ्या मुंबईने पॉवरप्लेनंतर ईशान किशनला गमावले. आज संधी मिळालेल्या फिरकीपटू रवी बिश्नोईने किशनला यष्टीपाठी झेलबाद केले. किशनला १७ चेंडूत केवळ ६ धावा करता आल्या.
पहिल्या ६ षटकांमध्ये मुंबईने १ बाद २१ धावा केल्या. डि कॉक बाद झाल्यानंतर रोहितला साथ देण्यासाठी ईशान किशन मैदानात आला आहे.
दुसऱ्याच षटकात मुंबईचा सलामीवीर क्विंटन डि कॉकने दीपक हुडाला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, हेन्रिक्सने त्याचा झेल टिपला.डि कॉकला 3 धावा करता आल्या.
पंजाबसाठी मोझेस हेन्रिक्सने टाकलेल्या पहिल्या षटकात पंचानी रोहितला झेलबाद दिले होते. मात्र, मुंबईने DRS घेतला. यात रोहित नाबाद असल्याचे समोर आले. पहिल्या षटकात मुंबईने 4 धावा केल्या.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने मागील सामन्यातील संघ कायम राखला आहे. पंजाबने आज मुरुगन अश्विनला बाहेर बसवले असून रवी बिश्नोईला संघात स्थान दिले आहे.