पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्लामविरोधी कारवाया करीत आहेत असा आरोप दहशतवादी संघटना आयसिसने केला आहे. आयसिसने १९ मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.  त्यांच्यामते, इस्लामविरोधात कोणता नेता काम करीत आहे असे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त व्लादिमीर पुतीन, बराक ओबामा, पोप फ्रान्सिस, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप इर्डोगन हे देखील इस्लामविरोधी असल्याचे आयसिसने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्तंबूलमध्ये रविवारी एका नाइटक्लबवर हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये ३९ जण ठार झाले आहेत. हा हल्ला होण्याच्या आधी आयसिसने हा व्हिडिओ इंटरनेटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांच्याविरोधात टीका करण्यात आली आहे. तुर्कीने सिरियामध्ये चाललेल्या युद्धामध्ये हस्तक्षेप करणे अनावश्यक होते असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष हस्तांदोलन करताना दिसत आहेत. जी-२० शिखर परिषदेच्या वेळी घेण्यात आलेला हा फोटो आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isis attack istanbul turkey narendra modi isis erdogen barack obama
First published on: 03-01-2017 at 14:43 IST