गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटानं शनिवारी पहाटे इस्रायल अचानकपणे हल्ला केला. हमासने इस्रायलवर ५ हजार रॉकेट्स डागले. याला इस्रालयनेही चोख प्रत्युत्तर देत गाझा पट्टीत रॉकेट्स हल्ले केले आहेत. यामध्ये इस्रायल आणि हमासमध्ये १००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

‘इंडिया टुडे’नं दिेलेल्या वृत्तानुसार, हमानसे केलेल्या रॉकेट हल्ल्यात ६०० हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, इस्रायलने ‘ऑपरेशन आयर्न स्वोर्ड्स’अंतर्गत केलेल्या हवाई आणि लष्करी हल्ल्यात ३७० हमास नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीत बॉम्ब हल्ले सुरूच आहेत.

हेही वाचा : “मला मारू नका”; इस्रायली विद्यार्थिनीचं हमासकडून अपहरण, थरकाप उडवणारा VIDEO

नेपाळी विद्यार्थी बेपत्ता

नेपाळचे परराष्ट्र मंत्री एन. पी. सौदन यांनी रविवारी सांगितल्यानुसार, “हमास दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यानंतर दक्षिण इस्रायलमध्ये शिकणारे १२ नेपाळी विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे.”

हेही वाचा : “ती स्वर्गात गेली”, हमास दहशतवाद्यांनी कुटुंबासमोर इस्रायली तरूणीला दिली फाशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हमासकडून १०० नागरिक आणि सैनिकांचं अपहरण करण्यात आल्याचं इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे. इस्रायल लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी म्हटलं, “गाझामधील ४२६ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे. यात हमासकडून रॉकेट्स हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या १० टॉवर्सचाही समावेश आहे.