अहमदाबाद :गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे (आप) इशुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे केले जात आहे. ‘आप’कडून शुक्रवारी तशी घोषणा करण्यात आली. ही घोषणा करताना दिल्लीचे मुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले, की या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत घेतलेल्या मतदानात ४० वर्षीय गढवी यांना ७३ टक्के मते पडली.

हेही वाचा >>> इम्रान खान यांच्या हल्ल्यामागे आहे गुजरात कनेक्शन? स्वत:च गौप्यस्फोट करत म्हणाले…

पाटीदार समाजाच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे ‘आप’चे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांच्याशी या उमेदवारीसाठी गढवी यांचा सामना झाला. गढवी द्वारका जिल्ह्यातील पिपलिया गावातील शेतकरी कुटुंबातील इतर मागास समाजातील आहेत. गुजरातच्या लोकसंख्येत इतर मागासवर्गीय ४८ टक्के आहेत. केजरीवाल यांनी सांगितले, की आम्ही गुजरातवासीयांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडण्याचे आवाहन केले होते. यासाठी १६ लाख नागरिकांनी मतदान केले. त्यापैकी ७३ टक्के जनतेने गढवी यांना पसंती दिली.

हेही वाचा >>> भारतातील ट्विटरचे कर्मचारी कपात करण्यास सुरुवात, इलॉन मस्कच्या आदेशानंतर मोठं पाऊल

गेल्या आठवडय़ात केजरीवाल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी ‘आप’चा उमेदवार निवडण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप, मोबाइल संदेश किंवा ई मेलद्वारे आपली मते ३ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत जनतेने आपली मते कळवावीत, त्यानुसार ४ नोव्हेंबर रोजी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडला जाईल, असे आवाहन केजरीवाल यांनी केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी केजरीवाल यांनी सांगितले होते, की पंजाब निवडणुकीत आम्ही जनतेला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडण्यासाठी आवाहन केले होते. पंजाबवासीयांनी भगवंत मान यांची बहुमताने निवड केली होते. त्यामुळे जनतेच्या मतानुसार आम्ही मान यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. ‘आप’तर्फे गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दहा उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली. आतापर्यंत पक्षाने ११८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.