ओडिशातल्या बालासोर या ठिकाणी झालेल्या अपघातात २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० प्रवाशांचा मृत्यू झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातात सुब्रतो पाल, देबोश्री पाल आणि त्यांचा मुलगा असे तिघेजण या अपघातातून बचावले आहेत.

पाल कुटुंब हे मलुबासन गावातले राहणारे आहेत. हे गाव पश्चिम बंगालमधलं आहे. या तिघांनी इतक्या भयंकर अपघातातून आपण वाचलो म्हणून देवाचे आभार मानले आहेत. आम्ही आमच्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जात होतो. मात्र त्याआधीच हा अपघात बालासोरमध्ये झाला. सुब्रतो पाल यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं आहे की आम्ही चेन्नईहून आम्ही खरगपूर स्टेशनवर गाडीमध्ये बसलो. बालासोर स्टेशन गेलं आणि एक मोठा झटका बसला त्यानंतर एक मोठा धूर झाला.. त्यापुढे काहीही दिसलं नाही. आम्ही या अपघातातून कसेबसे बचावलो आहोत. काही स्थानिक लोक आले त्यांनी आम्हाला ओढून बाहेर काढलं. त्यामुळे आम्ही वाचलो. नाहीतर काही खरं नव्हतं. देवच आमच्या मदतीला आला आणि आम्ही वाचलो. असंही त्यांनी सांगितलं आहे.

Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या

देबोश्री पाल यांनी सांगितलं, “आम्ही आमच्या मुलाला घेऊन चेन्नईला गेलो होतो. मात्र बालासोरला अपघात झाला. सुरुवातीला काय घडलं ते कळलंच नाही. मात्र खूपच धूर झाला होता. त्यानंतर लोकांनी आम्हाला तिथून बाहेर काढलं. आम्ही बाहेर पडल्यानंतर आम्ही वाचलो. मी आज जिवंत आहे मला यावर विश्वासच बसत नाही.” असं त्यांनी सांगितलं आहे.

नेमकी काय घडली घटना?

ओडिशा राज्यात शुक्रवारी (दि. २ जून) कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन झालेला रेल्वे अपघात हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा अपघात आहे. हा लेख लिहीपर्यंत या अपघातात २३३ प्रवासी मृत्युमुखी पडल्याची दुःखद बातमी हाती आली, तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी असल्याचे कळते. शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस १० ते १२ डबे आणि बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे तीन-चार डबे ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनागा बाजार स्टेशनजवळ एकमेकांवर धडकले. या अपघातानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ओडिशामध्ये एकदिवसीय दुखवटा जाहीर केला आहे. ओडिशामध्ये झालेला अपघात हा मागच्या दोन दशकातील सर्वात मोठा अपघात आहे. १९९९ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.