दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये महिलांनी प्रवेश करू नये, असा वादग्रस्त निर्णय मशीद प्रशासनाकडून घेण्यात आला होता. या निर्णयानंतर विविध स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उटमत असताना दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी केलेल्या विनंतीनंतर मशीद प्रशासनाकडून हा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी दिली आहे.

हेही वाचा – दिल्लीच्या जामा मशिदीत एकट्या दुकट्या ‘महिलांना’ प्रवेशबंदी; महिला आयोगाने बजावली नोटीस

”मशीद परिसरात काही अयोग्य कृत्ये निदर्शनास आल्यानंतर आम्ही महिलांना प्रवेश बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, नमाज अदा करण्यासाठी आलेल्यांवर कोणतीही बंद घालण्यात आली नव्हती. काही वेळापूर्वीच आम्ही २० ते २५ मुलींच्या गटाने जामा मशीद परिसराला भेट दिली. आम्ही त्यांना प्रवेशही दिला”, अशी प्रतिक्रिया शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी दिली.

हेही वाचा – …अन् त्याने थेट प्रेयसीच्या छातीत झाडली गोळी; OYO हॉटेलमधील थरकाप उडवणारी घटना

”या निर्णयामुळे वाद झाल्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांच्या विनंतीनंतर आम्ही हा निर्णय मागे घेतला आहे. मशीद परिसरात लावण्यात आलेले बोर्डही काढण्यात आले आहेत. मात्र, मशिदीला भेट देताना सर्वांना नियम पाळावे लागतील”, असेही ते म्हणाले.