जनता दल युनायटेड (जेडीयू) बिहारच्या बाहेर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणुन यापुढे राहणार नाही. तसेच, जेडीयू जम्मू-काश्मीर, झारखंड, हरियाणा आणि दिल्लीत होऊ घातलेल्या आगामी निवडणुका देखील स्वबळावरच लढणार आहे. हा निर्णय रविवारी पाटणा येथे पार पडलेल्या जेडीयूच्या कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आला.
https://twitter.com/ANI/status/1137645079286493184
या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात जेडीयूच्या खासदारांना मंत्रीपद घेऊ देण्यास नितीश यांनी नकार दिला होता. तर पक्षाच्या या बैठकीत नितीश कुमार काहीतरी मोठा निर्णय घेतील ही अपेक्षा होतीच. त्यानुसार त्यांनी एनडीएला धक्का देत स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे. खरेतर त्यांनी शुक्रवारी सांगितले होते की, भाजपा बरोबरचे आमचे संबंध पुर्वीप्रमाणेच चांगले राहणार आहेत. एनडीए आघाडीतील त्यांचा सहभाग कायम राहिल.
या बैठकीस मुख्यमंत्री नितीश कुमार, पक्षाचे वरिष्ठ नेते प्रशांत किशोर, नारायण सिंह व केसी त्यागी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत पक्षाची पुढील वाटचाल कशी राहील यावर चर्चा करण्यात आली.