अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांचा उल्लेख हुकूमशहा असा केलाय. राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्याच स्टेट ऑफ युनियन अ‍ॅड्रेसच्या भाषणामध्ये बायडेन यांनी पुतिन यांच्या जोरदार हल्लाबोल केलाय. पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करुन आज सात दिवस उलटले असून त्यानंतरही युद्ध सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांच्यावर टीका केलीय.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

अमेरिका युक्रेनच्या प्रत्येक इंच जमीनीचं संरक्षण करेल असं आश्वसही बायडेन यांनी दिलंय. बायडेन यांच्या या पहिल्याच स्टेट ऑफ द युनियन अ‍ॅड्रेसच्यावेळी युक्रेनचे राजदूतही उपस्थित होते. बायडन यांनी, “अमेरिकन लष्कर रशियन लष्कराविरोधात थेट लढणार नाही, मात्र त्याचवेळी ते रशियाला मनमानी कारभारही करु देणार नाही,” असं स्पष्टच सांगितलं आहे. अमेरिका रशियावर आर्थिक निर्बंध लादणार आहे. आपल्याला रशियाच्या खोटारडेपणाचा सामना आपल्या सत्याच्या आधारे करायचा आहे, असंही बायडेन यांनी म्हटलंय.

नक्की पाहा >> Photos: युक्रेनची भावनिक साद, पुतिन यांना रोकठोक प्रश्न अन् मोठं Standing Ovation; पाहा घडलं काय

पुतिन हे सध्या जागतिक समुदायापासून वेगळे पडले आहेत, असंही बायडेन म्हणाले. यापूर्वी पुतिन यांना अशाप्रकारे कधीच एकटं पाडण्यात आलं नव्हतं, असा दावा बयडेन यांनी केलीय. युरोपियन महासंघातील २७ देश सध्या युक्रेनसोबत असल्याचंही बायडेन म्हणाले आहेत. रशियाने पुकारलेल्या या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका आणि नाटो देश युक्रेनच्या एक-एक इंच जमीनीचं रक्षण करेल. पुतिन यांनी सध्या युद्धाच्या मैदानावर आघाडी मिळवली असली तरी त्यांना याची किंमत चुकवावी लागेल. “पुतिन हे हुकूमशहा असून ही लढाई हुकूमशहा विरुद्ध स्वातंत्र्य अशी आहे,” असा टोला बायडेन यांनी लगावलाय.

नक्की वाचा >> Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

रशियन लष्कर पश्चिमेकडे चाल करुन आलं तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. आम्ही युक्रेनच्या जनतेसोबत आहोत. पुतिन यांनी पूर्ण विचार करुन युक्रेनवर हल्ला केलाय. पुतिन यांना कोणताही देश ताब्यात घेऊ देणार नाही. ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे, असंही बायडेन यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा

युक्रेन एवढं कडवं आव्हान देईल असा अंदाज पुतिन यांना नव्हता असा दावाही बायडेन यांनी केलाय. अमेरिका आपलं हवाई क्षेत्र रशियामधून येणाऱ्या सर्व विमानांसाठी बंद करण्याची घोषणा करत आहे. पुतिन यांनी स्वतंत्र विश्वाच्या संकल्पनेवर हल्ला केल्याने हे निर्बंध आम्ही लादत आहोत, असं बायडेन यांनी म्हटलंय.

नक्की पाहा हा व्हिडीओ >> Viral Video: युक्रेनच्या शेतकऱ्याकडून रशियन लष्कराचा टप्प्यात कार्यक्रम; ट्रॅक्टरला रणगाडा बांधला अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिका आणि नाटो देश युक्रेनला १ अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत करणार असल्याचं बायडेन यांनी जाहीर केलंय. आमचं लष्कर युक्रेनमध्ये प्रत्यक्ष युद्धात कोणतीही ढवळाढवळ करणार नाही. मात्र इतर मार्गांनी आम्ही युक्रेनला शक्य ती सर्व मदत करणार आहोत. रशियापासून धोका असू शकतो अशी शक्यता असणाऱ्या भागांमध्ये नाटोच्या सैन्याला तैनात करण्यात आलंय, असंही बायडेन यांनी स्पष्ट केलं.