Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने जातीजनगणेची मागणी करत आहेत. मात्र, यावरून भाजपाकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. अशी मागणी करणं म्हणजे जातीजातींमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपाकडून केला जातो आहे. अशातच आता कर्नाटकमधील भाजपाच्या आमदाराने राहुल गांधींबाबत एक विधान केलं आहे. जात जणगनणेची मागणी करणाऱ्या राहुल गांधींना ते मुस्लीम आहे की ख्रिश्चन हेच माहिती नाही, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकच्या बीजापूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बसंगौडा पाटील यतनाल यांनी राहुल गांधींच्या जातीबाबत विधान केलं आहे. तसेच राहुल गांधी यांची वंशावळ तपासावी, अशी मागणीही त्यांनी केली. “राहुल गांधी अमेरिकेत जातात आणि देशविरोधी विधानं करतात. तर भारतात असताना ते जातीजनगणनेची मागणी करतात. मात्र, त्यांचा जन्म कोणत्या जातीत झाला, हे कुणालाही माहिती नाही. आपण मुस्लीम आहेत की ख्रिश्चन, हे स्वत: राहुल गांधी यांनाही माहिती नसेल, त्यामुळे राहुल गांधी यांची वंशावळ तपासावी”, असं ते म्हणाले.

हेही वाचा – S Jaishankar : “आयुष्य हे खटाखट म्हणण्याइतकं सोप्पं नाही, इथे…”; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा राहुल गांधींना टोला!

राहुल गांधी हे देशी कट्ट्यासारखे

पुढे बोलताना, “राहुल गांधी हे आपण ब्राह्मण असल्याचे सांगतात पण ते कोणते ब्राह्मण आहे? आणि ते ब्राह्मण असतील, तर ते जानवं घालतात का? हे आधी त्यांनी सांगावं”, असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच “राहुल गांधी हे देशी कट्ट्यासारखे आहेत. ते कधीच यशस्वी होऊ शकत नाही”, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – Rahul Gandhi Meet Ilhan Omar : भारताविरोधी भूमिका मांडणाऱ्या इल्हान ओमरची राहुल गांधींनी घेतली भेट, भाजपा आक्रमक!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुराग ठाकूर यांनीही केलं होतं विधान

महत्त्वाचे म्हणजे जुलै महिन्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही राहुल गांधींच्या जातीबाबत एक विधान केलं होतं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. “काही लोक केवळ ओबीसींबद्दल बोलत असतात. मात्र यांच्यासाठी (काँग्रेस) ओबीसी म्हणजे ओन्ली फॉर ब्रदर इन लॉ कमिशन आहे. त्याचबरोबर ज्यांची जात कोणाला माहिती नाही, तो जातीनिहाय जनगणेच्या गोष्टी करतायत. मी कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र उत्तर द्यायला कोण उभं राहिलं ते सर्वांनी पाहिलं आहे”, असं अनुराग ठाकूर म्हणाले होते.