S Jaishankar Critcized Rahul Gandhi at Geneva : इंडिया आघाडीचं सरकार आल्यास जनतेच्या बॅंक खात्यात खटाखट पैसे जमा होतील, असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं होतं. यावरून आता परराष्ट्र एस. जयशंकर यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. आयुष्य हे खटाखट म्हणण्याइतकं सोपं नाही, इथे कठोर मेहनत करावी लागते, असं ते म्हणाले. जिनिव्हा येथील भारतीय समुदायाला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केलं.

नेमकं काय म्हणाले एस.जयशंकर?

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी जिनिव्हा येथे भारतीय समुदायाला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या १० वर्षांच्या कामाचा लेखाजोगा मांडला. “काही लोक चीनमधून केलेल्या आयातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आपण चीनकडून इतकी आयात का करतो, असं विचारलं जातं. मात्र, १९६० ते १९९० च्या काळातील सरकारांनी कधीही उत्पादनाकडे लक्ष दिले नाही. आज जेव्हा आम्ही लोकांशी चर्चा करतो, तेव्हा आमच्याकडे संसाधने नाहीत त्यामुळे आम्ही उत्पादन क्षेत्राकडे वळू शकत नाही, असं सांगितलं जातं. मुळात जोपर्यंत उत्पादन क्षेत्र मजबूत होत नाही, तोपर्यंत तुम्ही जागतिक महासत्ता बनू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Devendra Fadnavis on Eknath Khadse
Devendra Fadnavis: ‘फडणवीसांनी मुलीची शपथ घेतली होती’, खडसेंच्या त्या गौप्यस्फोटवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “केंद्रीय नेतृत्वाने…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Ayodhya Gang Rape News
Ayodhya Gang Rape : धक्कादायक! अयोध्येत राम मंदिर परिसराची स्वच्छता करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, पाच जणांना अटक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

हेही वाचा – Amit Shah Targets Rahul Gandhi: “मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत…”, अमित शाह यांची लोकसभा विरोधी पक्षनेत्यांवर टीका; म्हणाले, “देशविरोधी…”

राहुल गांधींना लगावला टोला

पुढे बोलताना, त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनाही टोला लगावला. “देशाचा विकास करण्यासाठी योग्य त्या धोरणांची आवश्यकता असते. आयुष्य हे खटाखट म्हणण्याइतकं सोप्पं नाही, इथे कठोर परिश्रम करावे लागतात”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – CM Siddaramaiah : कर्नाटकात का होतेय मुख्यमंत्री बदलाची चर्चा? सिद्धरामय्यांशी निष्ठावान समजल्या जाणाऱ्या ‘या’ नेत्यांची CM पदासाठी चर्चा!

राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलं होतं?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी देशातील गरीब परिवारातील महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचं सरकार आल्यास, हे पैसे खटाखट महिलांच्या खात्यात जमा होतील, असं ते म्हणाले होते. त्यावेळी या विधानाची जोरदार चर्चा झाली होती. पंतप्रधान मोदींसह इतर भाजपाच्या नेत्यांनी यावरून राहुल गांधींना लक्ष्य केलं होतं.