scorecardresearch

Premium

लोकसभा निवडणुकीसाठी आप पक्षाच्या उमेदवारांची यादी दोन आठवड्यांत

दिल्ली विधानसभेत मोठे यश मिळविल्यानंतर ‘आप’ने राष्ट्रीय पातळीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आप पक्षाच्या उमेदवारांची यादी दोन आठवड्यांत

दिल्ली विधानसभेत मोठे यश मिळविल्यानंतर ‘आप’ने राष्ट्रीय पातळीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवारांची यादी पुढील दोन आठवड्यांत जाहीर करण्यात येईल, असे ‘आप’च्या नेत्याने सांगितले आहे.
‘आप’च्या राष्ट्रीय संसदीय समितीची आज बैठक होत असून, यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने चर्चा करण्यात येणार आहे. दिल्लीत ‘आप’ने बहुमत सिद्ध केल्यानंतर,  या सरकारने एक आठवडा पूर्ण केला आहे.  सूत्रांनी आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या पदासाठी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा चांगले पर्याय असणे देशासाठी आवश्यक आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kejriwal is a pm material says yadav as aap chalks out strategy for ls polls

First published on: 04-01-2014 at 01:34 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×