आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल सोमनाथ भारती यांना भाजप कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीविरोधात धरणे आंदोलनला बसले आहेत. या हल्ल्याचा निषेध करताना भारती यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे वाराणसीत ‘आप’ला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्यामुळे भाजपला आलेल्या वैफल्याचे द्योतक असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. नरेंद्र मोदींना अभिप्रेत देशभरात अशाचप्रकारे ‘गुजरात मॉडेल’ राबवायचे आहे का अशी विचारणा केजरीवाल यांनी केली. दरम्यान आज(गुरूवारी) नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. देशातील सर्वात प्रतिष्ठेती लढत म्हणून सगळ्यांचे वाराणसी मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदी हे वाराणसीत दाखल झाले असून या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2014 रोजी प्रकाशित
अरविंद केजरीवालांचे धरणे आंदोलन
भारती यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे वाराणसीत 'आप'ला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्यामुळे भाजपला आलेल्या वैफल्याचे द्योतक असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
First published on: 24-04-2014 at 11:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kejriwal on dharna against attack on bharti