खलिस्तानवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मान यांना धमकी देताना पन्नू याने सर्व गँगस्टरना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती पंजाब पोलिसांतील वरिष्ठ सूत्रांनी दिली असल्याची बातमी इंडिया टुडे या वृत्त संकेतस्थळाने दिली आहे. पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, गँगस्टर विरोधात आम्ही कडक धोरण अवलंबले असून अनुचित प्रकार करणाऱ्यांना कडक शासन करण्यात येणार आहे.

हे वाचा >> निज्जर प्रकरणी भारत कॅनडासमोर आक्रमक, मग पन्नू प्रकरणी अमेरिकेसमोर नमते का? ‘हत्येच्या कटा’चा आरोप किती खरा?

खलिस्तानी फुटीरतावादी आणि शीख फॉर जस्टिस संघटनेचा संस्थापक आणि अतिरेकी पन्नूने मागच्या काही दिवसांमध्ये भारताला अनेक धमक्या दिल्या आहेत. मागच्या महिन्यात पन्नूने एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला होता. ज्यामध्ये त्यांनी भारतीय संसदेवर १३ डिसेंबर रोजी हल्ला करणार असल्याची धमकी दिली होती. १३ डिसेंबर २००१ रोजी दहशतवादी अफजल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या स्मृतीदिनाच्या दिवशीच पुन्हा हल्ला करण्याचे संकेत त्याने दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अफजल गुरूचा फोटो वापरून गुरुपतवंतसिंग पन्नूने दिली भारताला धमकी; म्हणाला, “संसदेच्या…”

आता पुन्हा एकदा २६ जानेवारीचे औचित्य साधून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जीवे मारण्याच्या धमकी दिल्यामुळे पंजाबमधील पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.