Kolkata Rape Case Autospy Report : कोलकात्याच्या आरजीE कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आला होता, तिच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळल्या आहेत. त्या सर्व मृत्यूपूर्वीच जखमा झाल्या होत्या, असं पोस्टमार्टम अहवालातून स्पष्ट झालं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या अहवालात लैंगिक अत्याचाराचे संकेत देणारे, जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याचाही पुरावा सापडला आहे. पीडितेच्या डोक्यावर, चेहरा, मान, हात आणि गुप्तांगांवर १४ हून अधिक जखमा आढळल्या आहेत. गळा आवळल्याने तिचा मृत्यू झाल्याचंही शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. पीडितेच्या गुप्तांगात एक पांढरा, जाड, चिकट द्रव आढळला. या अहवालात फुफ्फुसात रक्तस्त्राव आणि शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तर,
फ्रॅक्चरची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत.

हेही वाचा >> Kolkata Rape Case : “डॉक्टरांना जगू द्या…”, कोलकाता बलात्कार प्रकरणी IMA च्या अध्यक्षांचं भावनिक पत्र!

रक्त आणि इतर शारीरिक द्रवांचे नमुने पुढील विश्लेषणासाठी पाठवण्यात आली आहेत. पोलिसांनी सांगितले होते की, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर ९ ऑगस्ट रोजी हॉस्पिटलच्या सेमिनार रूममध्ये मृतावस्थेत आढळली होती. कोलकाता पोलिसांचे नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला घटनेच्या दुसऱ्याच दिवशी गुन्ह्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. कोलकाता उच्च न्यायालयाने नंतर तपास सीबीआयकडे वर्ग केला.

महिला कर्मचाऱ्यांसाठी सेफ झोनची स्थापना

या भीषण गुन्ह्यामुळे देशभर संताप पसरला आहे. पश्चिम बंगाल आणि भारताच्या इतर भागांमध्ये डॉक्टर आणि परिचारिकांनी संप आणि निषेध केला आहे. जनक्षोभाच्या वेळी, आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर सीबीआयने त्यांची चौकशी केली.या घटनेला प्रतिसाद म्हणून, पश्चिम बंगाल सरकारने कामाच्या ठिकाणी, विशेषत: सरकारी रुग्णालयांमध्ये महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक उपाय जाहीर केले. या उपायांमध्ये महिलांसाठी, विशेषत: रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी नियुक्त सेवानिवृत्त कक्ष आणि CCTV-निरीक्षण ‘सेफ झोन’ची स्थापना यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याप्रकरणाची दखल घेतली आहे. यावर २० ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर पार पडणार असल्याची माहिती आहे.