पीटीआय, कराची

पाकिस्तानच्या अशांत अशा बलुचिस्तान प्रांतात सशस्त्र फुटीरतवाद्यांनी शनिवारी एका घरावर हल्ला करून सहा मजुरांना गोळय़ा घालून ठार केले व दोघांना जखमी केले. ही घटना क्वेट्टाच्या दक्षिणेला सुमारे ६०० किलोमीटर अंतरावरील तुर्बत शहराच्या उपनगर भागातील एका घरात घडली. अद्याप कुठल्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

 ‘सशस्त्र लोक मजूर राहात असलेल्या घरात घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात सहा जण जागीच ठार झाले, तर दोघे जखमी झाले’, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हे मजूर बलुचिस्तानबाहेरील होते आणि ते शहरातील एका खासगी बांधकाम प्रकल्पात काम करत होते असे प्राथमिक तपासात कळल्याचे हा अधिकारी म्हणाला. निररिराळय़ा प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी बलुचिस्तानात येणाऱ्या मजुरांना फुटीरतावादी गटांनी लक्ष्य बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही.

हेही वाचा >>>भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव; पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारतीय संघाने अहमदाबादमध्ये…”

 पाकिस्तानच्या मध्यवर्ती सरकारपासून स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी करणारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि इतर फुटीरतावादी गट गेली सुमारे दोन दशके या प्रांतात सौम्य स्वरूपाची बंडखोरी करत आहेत. बलुच फुटीरतावादी बहुधा पंजाब प्रांतातील लोकांना लक्ष्य बनवतात. यापूर्वी पंजाबी व सिंधी कामगारांना लक्ष्य बनवण्यात आले होते. इस्लामिक अतिरेकीही या भागात सक्रिय आहेत.