आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांचा कोरोना झाला आहे. त्यानंतर आता माच्या सात दिवसांपासून ते २४ तास ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. ललित मोदी यांनी यासंदर्भातली एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ललित मोदी यांनी म्हटलं आहे की त्यांना दोन आठवड्यात दोनवेळा कोरोनाची बाधा झाली. तसंच निमोनियानेही मला ग्रासलं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे ललित मोदी यांनी?

इंस्टाग्राम पोस्टमध्ये ललित मोदी म्हणाले की मला मागच्या दोन आठवड्यात दोनदा करोना झाला. त्यानंतर निमोनियाही झाला. तीन आठवड्यांपासून मी विलीगीकरणात आहे. एअर अँब्युलन्सने मला लंडनला आणण्यात आलं. माझे डॉक्टर माझ्यावर व्यवस्थित उपचार करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. मी मागच्या सात दिवसांपासून दिवसाचे २४ तास ऑक्सिजन सपोर्टवर आहे. मी माझ्या डॉक्टरांचा आणि मुलांचा तसंच सगळ्यांचा आभारी आहे असंली ललित मोदी यांनी म्हटलं आहे.

ललित मोदी यांनी रूग्णालयातला एक फोटो शेअर केला आहे. करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दोन डॉक्टरांनी मागचे तीन आठवडे माझ्यावर उपचार केले आहेत. मी २४ तास त्यांच्या देखरेखीतच होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुलै महिन्यात आले होते ललित मोदी चर्चेत

अभिनेत्री सुश्मिता सेनसोबत लग्न करणार असल्याचं एक ट्विट केल्याने ललित मोदी चर्चेत आले होते. सुरूवातीला आम्ही दोघं लग्न करणार असल्याचं ललित मोदी यांनी म्हटलं होतं त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलिट केलं आणि आम्ही एकमेकांना डेट करतो आहोत असं सांगितलं होतं. मात्र ललित मोदी त्यावेळी सुश्मिता सेनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आले होते. या दोघांच्या लग्नाच्या डेटिंगच्या बातम्या येत असताना दोघांनी म्हणजेच ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांनी साखरपुडा उरकल्याच्याही बातम्या आल्या. मात्र या सगळ्या चर्चा नंतर थंडावल्या. आता ललित मोदी हे ऑक्सिजन सपोर्टवर असल्याची बातमी समोर आली आहे.