श्रीनगर : लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी जुनैद अहमद भट याला चकमकीत ठार करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मंगळवारी दिली. जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गजवळ गगनगीर येथे झेड-मोढ बोगद्याचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांमध्ये भटचा समावेश होता असे पोलिसांनी सांगितले. २० ऑक्टोबरला झालेल्या त्या दहशतवादी हल्ल्यात बांधकाम कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा >>> सरन्यायाधीशांची खटल्यातून माघार; निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतील बदलाला याचिकांद्वारे आव्हान

Bollywood film stars in grip of mafia extortion
चित्रपटसृष्टीतील कलाकार हल्लेखोर, खंडणीखोरांच्या निशाण्यावर?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
Supriya Sule and Saif Ali Khan
Attack on Saif Ali Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या…
Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
terrorist cases are investigated with caste bias
प्रत्येक दहशतवादी प्रकरणाचा तपास जातीय पूर्वग्रहातून, दोषसिद्ध आरोपींचा उच्च न्यायालयातील अपिलात आरोप
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
Chandrapur Khalistan supporter arrested
मोस्ट वाँटेड खलिस्तानवाद्याला चंद्रपुरातून अटक, अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’…

श्रीनगर शहराबाहेर असलेल्या दाचिगाम जंगलामध्ये दहशतवादी वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने सोमवारी संध्याकाळी जंगलाची घेराबंदी केली. तेथे दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असताना जवानांवर गोळीबार झाला. त्यांनी त्याला उत्तर दिले. या चकमकीत भट ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गगनगीर घटनेचा तपास करताना सीसीटीव्ही चित्रण तपासताना पोलिसांना दोन हल्लेखोरांपैकी जुनैद भटची ओळख पटली होती. तो दक्षिण काश्मीरमधी कुलगाम येथील रहिवासी असून तो ‘अ’ सूचितील दहशतवाद्यांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक्सवरून या चकमकीची माहिती दिली. जुनैद भट हा गगनगीर, गांदरबल आणि इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता असे त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केले. भटच्या ताब्यात अमेरिकी बनावटीची एम-४ कार्बाईन ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader