scorecardresearch

देशात गेल्या २४ तासात आढळले १.७३ लाख करोना रुग्ण, ३,६१७ जणांचा मृत्यू

देशात सलग दुसर्‍या दिवशी दोन लाखांहूनही कमी करोना रुग्ण आढळले. गेल्या २४ तासात एकूण १.७३ लाख नवीन करोना रुग्ण आढळले.

देशात गेल्या २४ तासात आढळले १.७३ लाख करोना रुग्ण, ३,६१७ जणांचा मृत्यू
राज्यात आज रोजी एकूण ७५,३०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत..(संग्रहीत छायाचित्र)

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवाला आहे. दरम्यान, काही दिलासादायक वातावरण देशात आहे. भारतातील कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. सलग दुसर्‍या दिवशी देशात दोन लाखांहूनही कमी करोना रुग्ण आढळले. गेल्या २४ तासात एकूण १.७३ लाख नवीन करोना रुग्ण आढळले. जे गेल्या ४५ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. या कालावधीत ३६१७ लोकांनी करोनामुळे आपला जीवही गमावला आहे.

डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या सलग १६ व्या दिवशी बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे. गेल्या एका दिवसातच २.४८ लाख रुग्ण बरे झाले आहेत. यासह, भारतात सध्या रिकवरी रेट ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तो वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात सध्या करोनाची एकूण २२,२८,७२४ सक्रिय प्रकरणे आहेत.

१२ एप्रिल नंतर आज (शुक्रवार) नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र करोनामुळे मृत्यूंची संख्या सध्याही चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रात १०,०२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये ४८६ लोकांचा मृत्यू झाला. तसेच तामिळनाडूत ३१,००० नवीन करोना रुग्ण आढळले. तर कर्नाटकमध्ये २३,००० करोना बाधित आढळले

करोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण सुरू आहे. मात्र लशींचा तुटवडा असल्यामुळे देशात अनेक राज्यातील लसीकरण केंद्र बंद पडले आहेत. त्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. आतापर्यंत देशात २२,२८,७२४ लोकांचे लसीकरण झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या