भारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील केवळ एका शहराचा समावेश आहे. या शहराचं नाव आहे नवी मुंबई. या यादीत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे भारतातील स्वच्छ शहरांच्या यादीत इंदोर सलग सहाव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर सुरत आहे. सुरतनेही स्वच्छ शहर म्हणून दुसरा क्रमांक पटकावण्यात हॅटट्रिक केली आहे. राष्ट्रपती द्रौपती मूर्मू यांनी २०२२ ची ही स्वच्छ शहरांची यादी शनिवारी (१ ऑक्टोबर) जाहीर केली.

देशाची राजधानी आणि सत्तेचं केंद्र असलेल्या दिल्लीची या यादीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मागील वर्षी या यादीत पाचव्या क्रमांकावर असणारं दिल्ली शहर यंदा म्हणजे २०२२ मध्ये नवव्या स्थानावर घसरलं आहे. २०२० मध्ये दिल्लीचा क्रमांक या यादीत आठवा होता.

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
maharashtra top in gst collection
जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल! सरलेल्या आर्थिक वर्षात तिजोरीत ३.२ लाख कोटींची भर
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला

स्वच्छ शहरांच्या यादीत दोन वर्गवारी करण्यात आल्या आहेत. एक यादी एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची आहे, तर दुसरी यादी एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांची आहे. एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील केवळ एकाच शहराचा समावेश असला, तरी एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश आहे.

१ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या स्वच्छ शहरांची यादी

१. इंदोर
२. सुरत
३. नवी मुंबई<br>४. विशाखापट्टणम
५. विजयवाडा
६. भोपाल
७. तिरुपती
८. म्हैसूर
९. नवी दिल्ली
१०. अंबिकापूर

१ लाखाहून कमी लोकसंख्या असणाऱ्या स्वच्छ शहरांची यादी

१. पाचगणी (महाराष्ट्र)
२. पाटण (छत्तीसगड)
३. कराड (महाराष्ट्र)
४. लोणावळा (महाराष्ट्र)
५. कर्जत (महाराष्ट्र)

हेही वाचा : 5G Launch In India: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ; ‘या’ १३ शहरांत आजपासून 5G सेवा सुरू

स्वच्छ सर्वेक्षणाला २०१६ मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी या सर्वेक्षणात ७३ शहरांचा अभ्यास करण्यात आला होता. त्या तुलनेत २०२२ मधील शहरांची संख्या बरीच वाढली आहे. यंदाच्या सर्वेक्षणात देशभरातील ४ हजार ३५४ शहरांचा अभ्यास करण्यात आला. यात ६२ कँटोनमेंट बोर्डांचा समावेश होता.