लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वपक्षीय नेत्यांचा सभांचा धडाका सुरु असून वंचित बहुजन आघाडीचाही प्रचार जोमात सुरु आहे. मात्र, पुण्यात शनिवारी सकाळी प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला अल्पप्रतिसाद मिळाला. यासभेला फारशी गर्दी झाली नव्हती. मैदानातील खुर्च्या रिकाम्याच होत्या. संध्याकाळी याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी सभा होणार असून या सभेला तरी पुणेकर येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात चार टप्प्यांपैकी दोन टप्प्यांमधील मतदान झाले आहे. शेवटच्या दोन टप्प्यातील मतदानासाठी सध्या राजकीय पक्षांनीही कंबर कसली असून भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची नेते प्रचारसभा घेत आहेत. शनिवारी पुण्यातील वडगाव धायरी येथे बारामती लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low turnout at prakash ambedkar rally at pune
First published on: 20-04-2019 at 12:47 IST