गुजरातच्या मोरबीमध्ये झालेल्या भीषण पूल दुर्घटनेतून अहमदाबादचे रहिवासी विजय गोस्वामी आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले आहेत. गोस्वामी हे कुटुंबियांसोबत रविवारी दुपारच्या सुमारास या पुलावर पर्यटनासाठी गेले होते. यावेळी काही तरुण हा पूल मुद्दाम हलवत असल्याचं त्यांना दिसून आले. पुढचा धोका लक्षात घेता ते या पुलावरुन अर्ध्यातूनच माघारी फिरले. त्यानंतर अवघ्या काही तासातच हा पूल मच्छू नदीत कोसळला. गर्दीमुळे आणि काही तरुणांच्या कृत्यामुळे या पुलाला धोका असल्याची त्यांची भीती अखेर खरी ठरली.

Morbi Bridge Collapsed: मृतांची संख्या १३२ वर, १७७ जणांना वाचवण्यात यश; बचाव कार्य अद्यापही सुरु

“तरुणांकडून हा पूल मुद्दाम हलवला जात असताना नागरिकांना चालणंदेखील अवघड झालं होतं. या बाबत पूल कर्मचाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र, त्यांनी कारवाई केली नाही”, अशी माहिती गोस्वामी यांनी दिली आहे. गोस्वामी दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी या पुलावर कुटुंबियांसोबत गेले होते.

Morbi Bridge Collapsed : गुजरात पूल दुर्घटनेत भाजपा खासदाराच्या परिवारातील १२ जणांचा मृत्यू; पाच मुलांचा समावेश

पाहा व्हिडीओ –

“या परिसरातून निघण्यापूर्वी मी पूल कर्मचाऱ्यांना सतर्क केले होते. हा पूल हलवण्यापासून लोकांना थांबवा, असेही कर्मचाऱ्यांना सांगितले होते. मात्र, त्यांचा रस केवळ तिकीट विक्रीमध्ये होता. गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्यांच्याकडे व्यवस्थाच उपलब्ध नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले”, अशी धक्कादायक माहिती गोस्वामी यांनी दिली आहे. “ही दुर्घटना घडली तेव्हा पुलावर खूप गर्दी होती. लटकलेल्या दोरीला पकडल्याने मी या घटनेतून वाचलो. मात्र, माझे आई-वडील अद्याप बेपत्ता आहेत”, अशी आपबीती १० वर्षीय मुलाने पत्रकारांना सांगितली आहे.

Morbi Bridge: ‘फिटनेस’ प्रमाणपत्राशिवाय कंत्राटदाराकडून पूल पर्यटकांसाठी खुला, ‘ओरेवा’ समुहावर कारवाई होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दुर्घटनेतून बचावलेले मेहुल रावल यांनी या पुलावर ३०० लोक जमले होते, अशी माहिती दिली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेदरम्यान स्थानिकांनी पुढे येत अनेक लोकांचे जीव वाचवले आहेत. या घटनेत आत्तापर्यंत १३२ जणांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १७७ लोकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमधून दोन लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातलगांना चार लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.