मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात तीन केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांना विधानसभेची उमेदवारी दिल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
भाजपानं ३९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, मंत्री फग्गन सिंह कुलस्ते आणि मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार गणेश सिंह, खासदार राकेश सिंह, खासदार रीति पाठक, खासदार उदयप्रताप सिंह यांच्यासह भाजपा महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनाही तिकीट देण्यात आलं आहे.
हेही वाचा : “मध्यप्रदेश, तेलंगणा अन् छत्तीसगडमध्ये काँग्रेस जिंकेल, पण राजस्थानात…”, राहुल गांधी यांचं विधान
सतना मतदारसंघातून गणेश सिंह, सीधीमधून रीति पाठक, मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांना निवास मतदारसंघातून, प्रल्हाद सिंह पटेल यांना नरसिंहपूर या मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आलं आहे.
हेही वाचा : मध्य प्रदेश : भाजपाची ‘जन आशीर्वाद’ तर काँग्रेसची ‘जन आक्रोश यात्रा’, जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न!
दरम्यान, १७ ऑगस्टला भाजपानं पहिली यादी जाहीर केली होती. तेव्हा, ३९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. आतापर्यंत भाजपानं ७८ उमेदवारांची नावं घोषित केली आहेत.