राज्यात गेल्यावर्षी अभूतपूर्व अशी बंडाळी निर्माण झाली होती. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर भाजपाबरोबर जात एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केली. या घटनेला एक वर्ष पूर्ण होणार आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर गेल्याचं सांगितलं जात आहे. गुरूवारी ( ८ जून ) एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब वैष्णो देवीचं दर्शन घेतलं.

गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब गुरूवारी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले. तेथून विशेष हेलिकॉप्टरच्या मदतीने जम्मूतून सीधे पंछी हेलिपॅड येथे ३ वाजता पोहचले. येथे वैष्णो देवी मंदिर समितीचे अधिकारी नवनीत सिंह, अजय सलान आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ३.४५ वाजता ते वैष्णो देवीच्या मंदिरात पोहाचले. येथे एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब वैष्णव देवीचं दर्शन घेतलं.

हेही वाचा : श्रीकांत शिंदे यांच्या संपर्क अभियानात ठाकरेंच्या अपयशावर अधिक टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैष्णो देवी मंदिर समितीने पवित्र चुनरी भेट देऊन मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला. सायंकाळी ५.३० वाजता वैष्णो देवी भवन येथून हेलिपॅडवर पोहचत विशेष हेलिकॉप्टच्या मदतीने जम्मूला रवाना झाले. ‘अमर उजाला’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा : “औरंग्यास जिवंत केल्याशिवाय भाजपा-मिंधे सरकारच्या मुडद्यात…”, ठाकरे गटाचं टीकास्र

दरम्यान, एकनाथ शिंदे देवदर्शन आणि पर्यटनाबरोबर काश्मीरमधील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.