scorecardresearch

Premium

“औरंग्यास जिवंत केल्याशिवाय भाजपा-मिंधे सरकारच्या मुडद्यात…”, ठाकरे गटाचं टीकास्र

“तो औरंग्या राहील बाजूला, पेटवापेटवी करणारेच त्या आगीत…”, असा इशाराही ठाकरे गटाने दिला आहे.

eknath-shinde-uddhav-thackeray-devendra-fadnavis
ठाकरे गटाने एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका केली आहे.

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या नावाने मोर्चे निघत आहेत. आता औरंगजेबास खांद्यावर बसवून हिंदुत्व खतऱ्यात आणल्याच्या आरोळ्या ठोकल्या जात आहेत. गाडलेल्या मुडद्यांमुळे हिंदुत्व खतऱ्यात यावे इतके ते कच्चे व लेचेपेचे नाही. लेचेपेचे आहे ते भाजपाचे व मिंध्यांचे राजकारण. सरकार अपात्र ठरत आहे, ते कोसळणार आहे. त्यामुळे बुडत्यास काडीचा आधार तसा या बुडत्यांनी औरंगजेबाचा आधार घेतला असेल तर ते लाजिरवाणेच म्हणावे लागेल, अशी टीका शिवसेनेने ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

“तिकडे मणिपूर पेटले आहे ते यांना विझवता येत नाही. इथे महाराष्ट्र पेटवू पाहत आहेत. हा आगीशी खेळ त्यांना महाग पडेल. तो औरंग्या राहील बाजूला, पेटवापेटवी करणारेच त्या आगीत जळून जातील. हा इशारा आम्ही महाराष्ट्र हितासाठी देऊन ठेवीत आहोत,” असेही ठाकरे गटाने म्हटलं.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

हेही वाचा : “२०२४ च्या निवडणुकांची तयारी”; राज्यातल्या तणावावरून काँग्रेसची भाजपासह नरेंद्र मोदींवर टीका

“हिंदुत्व नासवण्याचा आणि विकृतीकडे नेण्याचा हा प्रकार”

“कर्नाटकात बजरंगबलीची गदा जाहीर सभांत फिरवूनही भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर खोदण्याचे काम सुरू झाले आहे. हिंदुत्व नासवण्याचा आणि विकृतीकडे नेण्याचा हा प्रकार आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर खणून कायमची विल्हेवाट लावण्याची भाषा केली. आता तर त्यांचेच सरकार आले व कबर जागेवर आहे आणि त्याच औरंगजेबाच्या मदतीने त्यांचे राजकारण सुरू आहे,” असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

“…ही तर भाजपची इच्छा आहे”

“जे ओवेसी बंधू हैदराबादेतून संभाजीनगरमध्ये येऊन औरंग्याच्या कबरीसमोर नमाज पढतात ते ओवेसी व त्यांचा पक्ष मोदी पक्षाचा अंतःस्थ मित्र आहे. उत्तर प्रदेशपासून अनेक राज्यांत विजय मिळवण्यासाठी ओवेसी पक्षास राजकीय सुपाऱ्या दिल्या जातात. मुसलमानांची मते फोडणारे यंत्र म्हणून त्यांचा वापर केला जातो हे काही लपून राहिलेले नाही. ओवेसी यांनी धर्मांध तणाव निर्माण करावा ही तर भाजपाची इच्छा आहे व तसे उद्योग घडवले जात आहेत,” असेही ठाकरे गटाने सांगितलं.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांची भर पत्रकार परिषदेत शिवीगाळ, ‘या’ मुद्द्यावर ‘मुंब्रा बंद’चा इशारा

“…त्याच कारस्थानाचा भाग आहेत”

“महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाने लागलेल्या आगी त्याच कारस्थानाचा भाग आहेत. औरंग्यास जिवंत केल्याशिवाय भाजपा-मिंधे सरकारच्या मुडद्यात जान फुंकली जाणार नाही,” असं टीकास्र ठाकरे गटाने सोडलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena thackeray group attacks shinde fadnavis govt over kolhapur and ahmednagar clashesh over aurangzeb ssa

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×