पीटीआय, कोलकाता
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) व समान नागरी कायदा यांची आपण राज्यात अंमलबजावणी होऊ देणार नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितले.काही लोक निवडणुकीदरम्यान ‘दंगली घडवून आणण्याचा’ प्रयत्न करतील असा दावा करतानाच, लोकांनी त्यांच्या कारस्थानाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी ईदनिमित्त येथील रेड रोडवर आयोजित मेळाव्यातील भाषणात केले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
‘आम्ही सीएए, एनआरसी व यूसीसी स्वीकारणार नाही. या सर्वाची जबरीने अंमलबजावणी आम्ही मान्य करणार नाही. मी द्वेषयुक्त भाषणे करत नाही. सर्वानी भावांसारखे शांतता व समन्वयाने राहावे असे मला वाटते. कुणालाही हे ऐक्य भंगू देऊ नका’, असे मेळाव्याला संबोधित करताना ममता म्हणाल्या.