पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीशेजारच्याच गावातील तरुणाने नवी दिल्लीत आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर काळी शाई टाकल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तो भारतीय जनता पक्षाचा तालुका सरचिटणीस आहे.
केजरीवाल यांच्या पक्षाचा प्रचार बेनामी देणग्यांवर सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. त्याला उत्तर देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
नारायणगव्हाण येथील नचिकेत वाल्हेकर असे या तरुणाचे नाव आहे. राळेगणसिद्धीच्या शेजारच्या गावातील रहिवासी असला तरी त्याचा हजारे यांच्याशी किंवा त्यांच्या कार्याशी कोणताही संबंध नाही. तो सन २००४ पासून भाजपचा कार्यकर्ता आहे. सध्या तो भाजपचा तालुका सरचिटणीस असून २००४ ची विधानसभा अपक्ष, तर गेल्या वर्षी झालेली जिल्हा परिषदेची निवडणूक त्याने वाडेगव्हाण गटातून भाजपतर्फे लढवली होती. दोन्ही निवडणुकांत अल्प मते मिळाल्याने त्याची अनामत रक्कमही जप्त झाली होती. गेल्या तीन महिन्यांपासून तो तालुक्याबाहेर आहे. आपण केरळमध्ये पीएच.डी. करीत असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष पोपटराव मोरे यांना सांगितले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्लीत काँग्रेसकडून सत्ता घेण्याचे भाजपचे मनसुबे आहेत, मात्र भाजपला परमेश्वरही वाचवू शकणार नाही तिथे नरेंद्र मोदींची काय गोष्ट. आम्ही दिल्लीत सत्तेवर आल्यावर सुराज्य येईल. राजकीय विकेंद्रीकरणाचे आमचे उद्दिष्ट आहे.
-अरविंद केजरीवाल- अध्यक्ष, आम आदमी पक्ष

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man claiming to be bjp worker disrupts arvind kejriwals press conference
First published on: 19-11-2013 at 01:37 IST