एक व्यक्तीने आपल्या पत्नीला अंमली पदार्थ देऊन परपुरुषांना बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर नशेत असलेल्या बायकोवर होणाऱ्या बलात्काराचे व्हिडीओही शूट केले आहेत. मागील १० वर्षांपासून आरोपी पती आपल्या पत्नीला जेवणातून ड्रग्ज देत होता. नशेत असलेल्या महिलेवर ५१ जणांनी तब्बल ९२ वेळा बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना फ्रान्समधील असून नराधम आरोपी पतीचं नाव डॉमिनिक पी. असं आहे. आरोपी व्यक्ती आपल्या पत्नीला दररोज रात्री जेवणातून अंमली पदार्थ देत असे. आरोपीने नशेत असलेल्या पत्नीवर अनेक पुरुषांकडून सुमारे १० वर्षे बलात्कार करायला लावल्याचा आरोप आहे. मागील दहा वर्षात ९२ बलात्काराच्या घटनांची पुष्टी तपास अधिकाऱ्यांनी केली आहे. बलात्कार करणाऱ्यांमध्ये २६ ते ७३ वर्षे वयोगटातील ५१ पुरुषांचा समावेश आहे. संबंधित आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे.

या आरोपींमध्ये अग्निशामक दलाचे जवान, ट्रक चालक, नगरपरिषद नगरसेवक, बँक-आयटी कंपनींमधील कर्मचारी, तुरुंगरक्षक आणि पत्रकार अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. पोलीस इतर आरोपी पुरुषांचा शोध घेत आहेत. आरोपी पती डॉमिनिकने आपल्या पत्नीच्या जेवणात ‘अँटी-अँझायटी’ औषध मिसळून हे घृणास्पद कृत्य घडवलं आहे.

हेही वाचा- Rape Case: “शरीरसंबंध ठेवण्यासाठी अल्पवयीन मुलीची संमती कायदेशीरदृष्ट्या…”; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेवणातून दिलेल्या ड्रग्जमुळे पत्नी बेशुद्ध झाल्यानंतर पती कथित आरोपींना पाहुणे म्हणून घरी बोलवायचा. त्यानंतर बेशुद्धावस्थेतील पत्नीवर कथित पाहुण्यांना बलात्कार करायला लावायचा. एवढेच नव्हे तर नराधम डॉमिनिकने या बलात्काराचे गुपचूप व्हिडीओही शूट केले आहेत. त्याने यूएसबी ड्राइव्हमध्ये “ABUSES” नावाची एक फाइल तयार करून यामध्ये बलात्काराचे व्हिडीओज जतन केले आहे. हे व्हिडीओ पाहून महिलेलाही धक्का बसला आहे. पोलिसांनी हा यूएसबी ड्राईव्ह जप्त केला आहे. २०११ ते २०२० या कालावधीत हे कथित बलात्कार झाल्याची माहिती तपास अधिकार्‍यांनी दिली. ज्यामध्ये आरोपी पुरुषांनी अनेक वेळा घरी भेटी दिल्या आहेत. आरोपी डॉमिनिक आणि त्याची पीडित पत्नी फ्रँकोइस यांच्या लग्नाला ५० वर्षांहून अधिक काळ झाला आहे असून त्यांना तीन मुलंही आहेत.