man slits own throat on Eid-ul-Azha in UP : उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात एखा व्यक्तीने स्वत:चाच गळा चिरून घेत शनिवारी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या व्यक्तीने ईद-उल-अजहा च्या दिवशी स्वत:चीच कुर्बानी दिली असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिकांनी दावा केला आहे की, मृत व्यक्तीने ईद-उल-अजहाच्या दिवशी स्वतःचे बलिदान दिले. त्या व्यक्तीने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे ज्यामध्ये त्याने “मी अल्लाह आणि त्याच्या प्रेशिताच्या नावाने स्वत:चे बलिदान देत आहे,” असे म्हटले आहे.

मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी अशी चिठ्ठी सापडल्याची पुष्टी केलेली नाही. त्यांनी सांगितले की या व्यक्तीने चाकूने त्याच्या घराजवळच्या झोपडीत त्याचा गळा कापून घेतला, पीटीआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

कुटुंबातील सदस्यांना जेव्हा त्याच्या ओरडण्याचा आवाज आला तेव्हा तो व्यक्ती त्यांना झोपडीत आढळून आला. त्यानंतर कुटुंबियांना त्याला पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी गोरखपूर वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आले. मात्र झालेल्या जखमेमुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला. हिंदुस्तान टाईम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

अतिरिक्त पोलिस अधीक्षक (उत्तर) अरविंद कुमार वर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, “प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की मृत व्यक्तीने स्वतःच जखम करून घेतली आहे. मात्र आम्ही प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत.”

या ६० वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबियांनी सांगितले की, ईदची नमाज अदा करून सुलतान सय्यद मखदूम अशरफ शाह दर्ग्यावरून परत आल्यानंतर शनिवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्यक्तीच्या पत्नीने सांगितले की, घरी आल्याबरोबर लगेचच तो घराच्या जवळच्या झोपडीत गेला. एका तासानंतर त्यांना ओरडण्याचा आवाज आल्याने जाऊन पाहिलं असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आणि त्याच्या जवळच चाकू पडल्याचे दिसून आले. पतीला पाहून त्याच्या पत्नीने आरडाओरड केली आणि शेजाऱ्यांना माहिती दिली, त्यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली.