वृत्तसंस्था, गुवाहाटी : मणिपूरमध्ये दोन कुकी-झोमी महिलांवरील लैंगिक अत्याचारांची चित्रफीत उजेडात आल्यावर देशभरात संतापाची लाट उसळलेली असून त्यामुळे मिझोरममध्ये राहणाऱ्या मैतेई समाजाच्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. अनेकांनी मिझोरम सोडण्यास सुरुवात केली असून मणिपूर सरकारने त्यांना आपल्या राज्यात आणण्यासाठी विमानांची व्यवस्था करण्याची तयारी रविवारी दर्शवली. त्यामुळे आता मणिपूरमधील हिंसाचाराचे परिणाम शेजारी राज्यांवरही दिसू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिझोरममधील मिझो समुदायाचे मणिपूरच्या कुकी-झोमी समाजाशी वांशिक संबंध असून त्यांचे मणिपूरमधील घडामोडींवर बारीक लक्ष आहे. वास्तविक ३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत मणिपूरमधील १२,५८४ कुकी-झोमी लोकांनी मिझोरममध्ये आश्रय घेतला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मिझोरममधील मैतेईंच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. त्यात मिझोरममधील ‘पीएएमआरए’ (पूर्वाश्रमीची दहशतवादी संघटना- मिझो नॅशनल फ्रंट) या संघटनेने ‘मैतेईंनी आपल्या सुरक्षिततेसाठी मिझोरम सोडावे,’ असा इशारा देणारे मिझो भाषेतील निवेदन शुक्रवारी प्रसारित केल्याने तणावात भर पडली आहे.

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

‘पीएएमआरए’च्या इशाऱ्यानंतर मिझोराम प्रशासनाने ऐझवालमधील मैतेईंच्या सुरक्षिततेसाठी चार ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. मणिपूर सरकारचे प्रवक्ते सपम रंजन सिंह म्हणाले, ‘‘सरकार ‘ऑल मिझोराम मणिपूर असोसिएशन’च्या संपर्कात आहे. काही मैतेई लोक मिझोराम सोडून जाऊ लागले आहेत; परंतु मिझोराम सरकारच्या गृह विभागाने एक निवेदन जारी केले असल्यामुळे तणावाचे वातावरण निवळू शकते. तसेच गरज असेल तर मणिपूर सरकार मैतेईंसाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था करू शकते.’’

शनिवारी दुपारी काही मैतेई नागरिक मिझोरामबाहेर जात होते. त्यांच्यात खासगी कंपनीत काम करणारा एक कर्मचारी होता. तो आपल्या चौघा कुटुंबीयांसह आसामच्या कचार जिल्ह्यात खासगी वाहनाने निघाला होता. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना, तो म्हणाला की मिझोराममध्ये राहण्यात आतापर्यंत धोकादायक नव्हते, पण आता अनेक मैतेई भीतीने सामानसुमान भाडय़ाच्या घरात तसेच ठेवून आपल्या मूळ गावी जात आहेत. बराक खोऱ्यातील बरेच लोक रस्तेमार्गाने वाहनाने जात आहेत, तर अनेकांनी ऐझवाल विमानतळावर आश्रय घेतला आहे.

४१ मैतेई आसामध्ये परतले

गुवाहाटी : मिझोरममधील पूर्वाश्रमीच्या दहशतवादी गटाने तेथील मैतेई नागरिकांना राज्य सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ४१ मैतेई नागरिक  मिझोरममधून आसामला आपल्या मूळ गावी पोहोचल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

काय घडले?

  • मिझोराममधील ‘पीएएमआरए’ या संघटनेने, ‘मैतेईंनी आपल्या सुरक्षिततेसाठी मिझोराम सोडावे,’ असा इशारा देणारे निवेदन शुक्रवारी प्रसारित केले होते.
  • त्यात, ‘‘मणिपूरमधील कुकी-झोमी समुदायाविरोधातील हिंसाचारामुळे मिझोराममधील झोमी समाजाच्या भावना दुखावल्या असून मैतेईंसाठी आता मणिपूरमध्ये राहणे सुरक्षित राहिलेले नाही,’’ असे म्हटले होते.
  • यानंतर मिझोराममधील मैतेईंमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी राज्य सोडण्यास सुरुवात केली.

मिझोराममध्ये किती मैतेई?

मिझोरामची राजधानी ऐझवालमध्ये सुमारे दोन हजार मैतेई नागरिक आहेत. त्यांत सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि कामगारांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतेक जण मूळ आसामच्या बराक खोऱ्यातील आहेत. मणिपूरमधील १२,५८४ कुकी-झोमी लोकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतल्याने मैतेईंच्या मनात भीती निर्माण झाली आहे.