माओवाद्यांनी बिहारमध्ये रफीगंज व इस्माइलपूर भागात रेल्वेमार्ग स्फोटाने उडवून दिले त्यामुळे भुवनेश्वर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचे पायलट इंजिन रुळावरून घसरले. या घटनेत प्राणहानी झालेली नाही, काल रात्री उशिरा हा स्फोट झाला असे मगध परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक पी.के.श्रीवास्तव यांनी सांगितले.पाटणा येथे पूर्व मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अरविंदकुमार राजक यांनी सांगितले, की भुवनेश्वर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचे पायलट इंजिन रुळावरून घसरले. त्यानंतर अनेक मेल व एक्स्प्रेस गाडय़ा गया व मुगलसराय दरम्यान अडकून पडल्या. माओवाद्यांनी पोलिसाच्या गोळीबाराच्या विरोधात बंदची हाक दिली होती
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2014 रोजी प्रकाशित
नक्षलवाद्यांनी बिहारमध्ये रेल्वे मार्ग उडवला
माओवाद्यांनी बिहारमध्ये रफीगंज व इस्माइलपूर भागात रेल्वेमार्ग स्फोटाने उडवून दिले त्यामुळे भुवनेश्वर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचे पायलट इंजिन रुळावरून घसरले.

First published on: 24-07-2014 at 03:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maoists explode rail track pilot engine of rajdhani derails