मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी आपल्या कंपनीचे नाव मेटावर्स ( Metaverse ) केल्यानंतर त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कंपनीच्या नामांतरानंतर झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत या वर्षात ७१ बिलियन डॉलर्सची घसरण झाली असल्याचे पुढे आले आहे. या घसरणीनंतर त्यांची संपत्ती ५५.९ बिलियन डॉलर्स असून अब्जाधिशांच्या यादीत ते २०व्या स्थानावर आहेत.

हेही वाचा – जागतिक बँकेकडून पंजाबला १५० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज

दोन वर्षांपूर्वी मार्क झुकेरबर्ग यांची संपत्ती १०६ बिलियन डॉलर्स एवढी होती. मात्र, त्यांनी त्यांच्या कंपनीचे नाव फेसबूक आएनसी वरून मेटावर्स केले. त्यानंतर त्यांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार २०२२ च्या पहिल्या सहामाहित जगभरातल्या पहिल्या ५०० अब्जाधिशांना १.४ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – VIDEO : कबड्डी स्पर्धेदरम्यान खेळाडूंना शौचालयात जेवण; उत्तर प्रदेशाच्या सहारनपूरमधील धक्कादायक प्रकार

काहीदिवसांपूर्वीच अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस आणि लुई वित्तॉनचे बरर्नाड आरनॉल्टला मागे टाकत भारतीय उद्योपती गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक बनले आहेत. फोर्बच्या यादीनुसार गौतम अदानी यांची संपत्ती १५४.७ अमेरिकी डॉलर्स एवढी असून ते दुसऱ्या स्थानावर आहे. तर २७३.५ अब्ज अमेरिकी डॉलर्ससह इलॉन मस्क हे पहिल्या स्थानावर आहेत.