दिल्लीतील नरेला परिसरातील एका OYO हॉटेलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका ३८ वर्षीय विवाहित व्यक्तीने आपल्या प्रेयसीची गोळी घालून हत्या केली आहे. या प्रकारानंतर आरोपीनं स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा जीव वाचला आहे. प्रवीण उर्फ सितू असं आरोपीचं नाव असून त्याच्यावरराजीव गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी आरोपी प्रवीण आपल्या प्रेयसीसोबत OYO हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी हॉटेल रुममध्येच या जोडप्यामध्ये जोरदार वाद झाला. यानंतर आरोपीनं रागाच्या भरात आपल्या प्रेयसीच्या छातीत गोळी झाडली. प्रेयसीचा खून केल्यानंतर आरोपीने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला.

हेही वाचा- Love Jihad: श्रद्धा वालकर प्रकरणाचा सूचक संदर्भ देत अशोक गेहलोत यांची भाजपावर टीका; म्हणाले, “ही एक…”

या गोळीबाराच्या घटनेनंतर हॉटेलच्या आवारात एकच खळबळ उडाली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गीता असं ३९ वर्षीय मृत प्रेयसीचं नाव आहे. आरोपी प्रियकराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रवीणवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

हेही वाचा- ‘I Have Got News’, श्रद्धाचं शेवटचं चॅट आलं समोर, मृत्यूच्या काही तास आधीच मित्राला पाठवला होता मेसेज

विशेष म्हणजे २१ सप्टेंबर रोजी आरोपीवर आणखी एका खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गौरव नावाच्या एका तरुणाची गोळी घालून हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्यानंतर काही दिवसातच त्याला जामीन मिळाला होता.