लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि विरोधी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) या दोन्हींपासून पूर्ण अंतर राखून आपली ताकद अधिक वाढवण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत.

 मायावती यांनी रविवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील पक्षाची तयारी, पक्षाला असलेला सामाजिक पाठिंबा वाढवणे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसह अन्य महत्त्वाच्या मुद्दय़ांवर बैठक घेतली.

हेही वाचा >>> भाजपा महिला नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल, राहत्या घरातच…

पक्षाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना खोटय़ा बातम्या आणि अपप्रचारापासून सावध करताना, मायावती म्हणाल्या, की ‘‘या अपप्रचारामागे बसप विरोधकांचे षडयंत्र आहे. सातत्याने असा अपप्रचार सुरू आहे. म्हणूनच आपण सतत सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अत्यंत सजग राहून आपण आपल्या निवडणुकीची तयारी करावी. या अपप्रचाराचा आपल्या तयारीवर परिणाम होता कामा नये.’’

भाजपच्या निवडणुकीच्या रणनीतीचा संदर्भ देत मायावती म्हणाल्या की, देशातील जनतेसमोर ज्वलंत समस्या आहेत. त्रासदायक महागाई, कमालीची गरिबी, बेरोजगारी, उत्पन्नात घट, खराब रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण आणि गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था आदी समस्या सर्वसामान्यांना भेडसावत आहेत. त्यांना याची चिंता वाटत असली तरी आगामी  निवडणूक प्रचारात हे मुद्दे गांभार्याने घेतले जातील की नाही, याबाबत आताच सांगणे कठीण आहे.

हेही वाचा >>> JNU च्या भिंतींवर ‘भगवा जलेगा’, ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा, वातावरण तापल्यानंतर तपास सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आरक्षण कमकुवत करण्याचे प्रयत्न’

लोकहित आणि जनकल्याणासंदर्भात भाजप आणि काँग्रेसची जनविरोधी वृत्ती असल्याचे दिसून आले आहे, असा आरोप करून मायावती म्हणाल्या की, शतकानुशतके जातीयवादाच्या आधारे सामाजिक आणि आर्थिक शोषण, अन्याय आणि विषमतेला बळी पडलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांची मुक्ती आणि समानतेसाठी संविधानात आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे, परंतु त्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. हे आरक्षण निष्क्रिय आणि कुचकामी करण्याचे प्रयत्न प्रत्येक स्तरावर सुरू आहेत.