Honour Killing Case In UPs Meerut: उत्तर प्रदेशातील मेरठ पोलिसांनी एका महिलेला आणि तिच्या कुटुंबातील चार सदस्यांना, तिच्या १७ वर्षांच्या मुलीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय राकेश देवी, मोनू (४०), कमल सिंग (५६), समर सिंग (५४) आणि एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने १७ वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर बोल्ट कटरने तिचे शिर धडापासून वेगळे केले.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील गौरव नावाचा एक आरोपी फरार आहे. पीडितेला तिच्या प्रियकरासोबत बोलताना पकडले गेल्यामुळे त्यांनी तिची हत्या केली, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. मुलीचे वडील सीआरपीएफ कर्मचारी असून, ते छत्तीसगडमध्ये तैनात आहेत. त्यांना या गुन्ह्याची काहीच माहिती नव्हती.

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पीडितेचा प्रथम गळा दाबून खून करण्यात आला, नंतर तिची आई, चुलत भाऊ आणि इतर लोकांनी तिचे शिर धडापासून वेगळे केला. “पीडित आस्था हिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि नंतर तिच्या ४० वर्षीय आईने तिच्या चुलत भावंडांच्या आणि इतरांच्या मदतीने बोल्ट कटरने तिचे शिर कापले केला,” असे मेरठचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विपिन ताडा यांनी पीटीआयला सांगितले.

२८ मे रोजी, आरोपींनी दौराळा येथे १७ वर्षीय आस्थानची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून, आरोपींनी तिचे धड कापडात गुंडाळून बहादूरपूर कालव्यात टाकले आणि कापलेले शिर गंगा कालव्यात फेकून दिले. पीडितेचे शिर अद्याप सापडलेले नाही,” अशीही माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.

या प्रकरणातील आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी पीडित आस्था बुधवारी सकाळी शाळेसाठी घरून निघाली होती परंतु संध्याकाळपर्यंत परतली नाही असा दावा करत, ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

हत्येच्या दुसऱ्या दिवशी, २९ मे रोजी एका स्थानिक शेतकऱ्याने कालव्यात मृतदेह पाहिला. कपड्यांमुळे पोलिसांना पीडितेची ओळख पटवण्यास मदत झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी पुढे पोलिसांनी तिच्या प्रियकराला गाठले. तेव्हा पोलिसांना कळाले की, पीडित आस्था आणि तिच्या प्रियकराची सुमारे आठ महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. हे तिच्या कुटुंबाला मान्य नव्हते.