गुजरात निवडणुकीआधी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आणंद आणि मेहसाना जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना नागरिकत्व बहाल करण्याचा आदेश दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे नागरिकत्व वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ (सीएए) अंतर्गत देण्यात येणार नसून, नागरिकत्व कायदा, १९५५ अंतर्गत देण्याचा आदेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्यासंबंधीचे अधिकार देण्यात आले आहेत.

‘सीएए’मध्येही पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चनांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. मात्र सरकारने अद्याप कायद्यासंबंधी नियमावली तयार केली नसल्याने कोणालाही त्याच्या अंतर्गत नागरिकत्व दिलं जात नाही.

करोना लसीकरण मोहीम संपताच CAA लागू करणार, अमित शाह यांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरातमधील या दोन जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या संबंधितांना ऑनलाइन पद्घतीने आपला अर्ज दाखल करावा लागणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी त्याची छाननी करतील. तसंच अर्जाहसित आपला अहवाल केंद्राकडे सोपवतील. संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधिकांना नागरिकत्व आणि यासंबंधीचं प्रमाणपत्रही दिलं जाईल.