थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे सोमवारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. सोमवारी सकाळी १ वाजून ५३ मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवला, अशी माहिती डेहराडूनच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिली आहे.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५३ इतकी नोंदविण्यात आली. सुमारे साडेचार सेकंद इतका ह्या भूकंपाचा कालावधी होता. कांगा जिल्ह्यातील बैजनाथपासून १७ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती भूगर्भशास्त्र विभागाने दिली. या भूकंपामध्ये कोणतीही वित्त किंवा जीवित हानी झालेली नाही. यापूर्वीही सप्टेंबर महिन्यात या परिसराला भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले होते.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2012 रोजी प्रकाशित
धर्मशालाला भूकंपाचा सौम्य धक्का
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे सोमवारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. सोमवारी सकाळी १ वाजून ५३ मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवला, अशी माहिती डेहराडूनच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिली आहे.
First published on: 13-11-2012 at 04:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mild earthquake in dharamsala